Gunaratna Sadavarte Challenge Manoj Jarange : मनोज जरांगेंना गुणरत्न सदावर्तेंचे चॅलेंज, अध्यादेशाने हुरळून जाऊ नका...

Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगे म्हणत आहेत, की 37 लाख प्रमाणपत्रे वाटप झाली. मात्र, तीन हजारसुद्धा प्रमाणपत्र वाटप होऊ शकत नाहीत.
Manoj Jarange On Sadavarte
Manoj Jarange On Sadavarte Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मराठा समाज मागास नाही. सरकारने जो अध्यादेश काढला आहे ती फक्त नोटीस आहे. त्यामुळे हुरळून जाऊ नका. मी या त्याविरोधात न्यायालयात जाणार आहे. मराठा समाजाला ईडब्लूएसमधून आरक्षण मिळू नये, म्हणून हा डाव आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले होते. सोमवारी सगळ्या गोष्टी न्यायालयात सविस्तपणे मांडू. खुल्या वर्गातील जागा अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनोज जरांगे-पाटील यांच्यासह राज्य सरकारला चॅलेंज केले आहे.

Manoj Jarange On Sadavarte
Jarange Patil's Mother Reaction : महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा-बाळांचं कल्याण झालं; मनोज जरांगेंच्या आईची प्रतिक्रिया

आरक्षणात मागच्या बाजूने प्रवेश करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ओबीसीबांधवांनी घाबरून जाऊ नये. संभाजीनगर उच्च न्यायालयाने सांगितले आहे, की मराठवाड्यातील कुणबी हे मागास नाहीत. जरांगे (Manoj Jarange) म्हणत आहेत, की 37 लाख प्रमाणपत्रे वाटप झाली. मात्र, तीन हजारसुद्धा प्रमाणपत्र वाटप होऊ शकत नाहीत. त्यामुळे मराठाबांधवांनी गैरसमज करून घेऊ नये, असे सदावर्ते (Gunaratna Sadavarte ) म्हणाले. Gunaratna Sadavarte Challenge Manoj Jarange

मनोज जरांगे हे काही वकील नाहीत. त्यामुळे ते काय म्हणतात याला अर्थ नाही. सरकारच्या नोटीसनंतर गुलाल उधळून आनंद व्यक्त करायला ही काय निवडणूक होती का? यातून कोणीही हुरळून जाऊ नये. न्यायालयाने दिलेल्या निकालावर आहे की आजची नोटीसवर आहे. एकही प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिले जाऊ शकत नाही.

जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये ज्याच्याकडे सत्ता आहे, त्यांना आरक्षण देणे योग्य आहे की नाही हे सांगितले आहे, ते पाहावे. जरांगे यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. जरांगे यांचे आंदोलन स्टंटबाजी आहे. ही काय राजकारणाची निवडणूक होती का गुलाल उधळायला, असा सवालदेखील सदावर्ते यांनी केला.

R...

Manoj Jarange On Sadavarte
Bihar Politics : बिहारमधील काँग्रेसचे काही आमदार 'नॉट रिचेबल'; राजकीय भूकंप होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com