

Tara Bhawalkar speech : साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. दरम्यान संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नाशिकच्या कथित तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत त्यावर भाष्य केले.
नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरीत येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन परिसरातील जागेवर साधुग्राम उभारले जाणार आहे. मात्र त्यासाठी येथील जागा मोकळी करावी लागणार असून त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडली जाणार आहे. त्याविरोधात पर्यावरणप्रेमींचे नाशिकमध्ये आंदोलन सुरु आहे. वृक्षतोडीला नाशिककरांचा कडाडून विरोध आहे.
आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा काढला. तारा भवाळकर यांनी एक ओवी ऐकवली. 'राम म्हणे सीता नाशिक चांगलं, गोदावरी काठी मन दोघांचं रमलं. प्रभूरामचंद्र व सीता मातेचे मन ज्या ठिकाणी रमलं होतं असं ते तपोवन. लहानपणापासून आम्ही जे अनुभवत आलो असं नाशिकचं तपोवन ज्याच्यावर आता अक्षरशः कुऱ्हाड पडत आहे असे वातावरण निर्माण होत आहे.
तपोवनात चळवळ सुरु आहे. वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत आहे. सामान्य नागरिकांपासून अभिजनांपर्यंत सगळ्यांचा वृक्षतोडीला विरोध आहे. कारण प्रकृती टिकली तरच आपण प्रकृतीचा भाग असलेली माणसं टिकणार आहोत.
त्यामुळे मी पर्यावरण वैगेरे असे शब्द मी वापरत नाही. ती प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये आपण जी पंचतत्वे मानतो, ही झाडांच्या पानांच्या पृथ्वी, आग, पाणी, वायू, आकाश ही सगळी झाड, पानं, मातीच्या आश्रयाने जगतात आणि म्हणून आपण जगतो. कारण आपण प्रकृतीचा एक अंश असतो. आपल्याला स्वार्थ म्हणून देखील जगायचं असलं तरी वनांचे जतन हे आपल्याला प्राणपणाने करावे लागेल. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्राण टिकणे अवघड होईल असं मला आवर्जुन सांगावे वाटते असे त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.