Thackeray News: महिनाभरातच 'ठाकरें'नी मारली पलटी !

Nitin Thackeray Politics BJP's Thackeray campaigning for Shiv Sena's Gulve : लोकसभा निवडणुकीत भाजपनिष्ठा शिकवणारे ॲड नितीन ठाकरे लागले शिवसेनेच्या गुळवे यांच्या प्रचारात
Teachers constituency News
Teachers constituency NewsSarkarnama

Teachers Constituency News : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांची भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी पक्ष आणि राजकीय विचारसरणीवर बाजूला ठेवत आयाराम गयाराम वृत्तीचे प्रदर्शन घडविले आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे आणि त्यांच्या प्रचारासाठी पुढे आलेले भाजपचे ॲड ठाकरे यांची भूमिका सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गुळवे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांच्यासमवेत नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, राजेंद्र ताजणे आणि भाजपचे नेते म्हणून घेणारे नितीन ठाकरे हे देखील होते. त्यामुळे गुळवे यांची उमेदवारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते असलेल्या गुळवे यांनी शिवसेना (ShivSena) ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची उमेदवारी मिळवली. गंमत म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी पुढे आलेले ॲड नितीन ठाकरे हे महिन्याभरापूर्वी लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागत होते.

त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी संपर्क केला असता ठाकरे यांनी मी भाजपचा एकनिष्ठ आहे. भाजपशीच निष्ठा ठेवणार असे त्यांना सुनावले होते. त्यामुळे ते उमेदवारी आणि पर्यायाने खासदारकीपासूनही वंचित राहिले.

Teachers constituency News
Shubhangi Patil: उद्धव ठाकरेंनी बंडखोरी थोपवली, शुभांगी पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

मराठा विद्या प्रसारक संस्था ही जिल्ह्यातील आणि राज्यातील नावाजलेली संस्था आहे. या संस्थेच्या सभासदांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा पगडा आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत गतवर्षी ॲड ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी जवळीक साधली होती.

त्यामुळे अनेकांनी ठाकरे यांचा प्रचार केला होता. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनीही ठाकरे यांना छुपी मदत केल्याचे बोलले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत ॲड ठाकरे हे शरद पवार यांच्या महाविकास आघाडी बरोबर जातील अशी अपेक्षा होती.प्रत्यक्षात तसे घडले नाही.

ठाकरे यांनी महिन्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनिष्ठा दाखवली होती. मात्र अवघ्या महिनाभरातच पलटी मारत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारात भाग घेतला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यावर ॲड ठाकरे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे काही माजी पदाधिकारी आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आम्ही संस्था पातळीवर संदीप गुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे.आम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहोत. गुळवे आमच्या संस्थेचे संचालक आहेत असे त्यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com