Satyajeet Tambe News; `टीडीएफ` नंतर शिक्षक सेनेने देखील तांबेंना झिडकारले!

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक सेनेने तांबे यांना विरोध केला आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना शिक्षक सेनेने विरोध दर्शवला आहे. यापुर्वी शिक्षक पुरोगामी आघाडीने (TDF) आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना पाठींबा दिला होता. मात्र त्यांनी या पाठींब्याचा फेरविचार होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना हा झटका मानला जात आहे. (Satyajeet Tambe got first shock by Teachers sena in Graduate constituation)

Satyajeet Tambe
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना तिळगुळ द्यायला आवडेल..

नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता कायम आहे. काँग्रेसने त्यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे अद्याप भाजपने त्यांना पाठींबा दिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीत गोंधळाचे चित्र कायम आहे.

Satyajeet Tambe
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीनं घेतला अचानक पेट

यासंदर्भात शिक्षक सेनेने सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट व्हायरल केली असून भाजपकडून त्यांना पाठिंबा मिळणार आहे, म्हणून आम्ही विरोध करत असल्याचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे रणधुमाळी हळूहळू पेट घेत आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचा आणि ५४ तालुक्यांचा मतदार संघात २२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस पुरस्कृत डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म मिळालेला असताना त्यांनी भरला नाही, या उलट त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी करण्यासाठी माघार घेतल्यामुळे शिक्षक सेनेने सत्यजित तांबे यांना शिक्षक सेनेचा विरोध असल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले आहेत. नाशिक विभागात शिक्षकांचे वेगवेगळे गट व संघटना कार्यरत आहे, शिक्षक सेना हा त्यापैकीच एक गट असून पदवीधर मतदारसंघात तांबेंना विरोध दर्शवला आहे. शुभांगी पाटील यांना शिक्षक सेनेने उमेदवारी जाहीर केल्यास सक्षमपणे आम्ही प्रचार करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान या मतदारसंघात पुरोगामी शिक्षक संघटनेचा प्रभाव आहे. या संघटनेने यंदा उमेदवारी जाहीर न करता, काँग्रेसचे आमदार डॉ. तांबे यांना पाठींबा जाहीर केला होता. मात्र त्यानंतर गेल्या तीन दिवसांत घडलेल्या घडामोडीनंतर त्यांना आपला हात आखडता घेत अपक्ष सत्यजीत तांबे यांना पाठींबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. पुणे येथे होणाऱ्या बैठकीत संघटना आपली भूमिका निश्चित करणार आहे.

सत्यजित तांबे हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहे, हे दिसून येत असून महाविकास आघाडीचे नेते व उद्धव ठाकरे हे जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. सत्यजित तांबे यांना शिक्षक सेनेचा विरोध आहे.

- संजय चव्हाण, विभागीय अध्यक्ष, शिक्षक सेना.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com