Teachers Transfer : नगरमधील 118 गुरुजी कायद्याच्या कचाट्यात! काय आहे प्रकरण ?

Nagar Fraud : जिल्ह्यातील आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात तक्रार
Teachers
TeachersSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर जिल्हा परिषदेमध्ये 2017 ते 2022 या कालावधीत आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या होत्या. याअंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्व आणि घटस्फोटाचा आधार घेऊन बदलीचा लाभ घेतलेल्या 118 गुरुजींची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने नगरच्या कोतवाली पोलिसांना दिली आहे. या गुरुजींभोवती कारवाईचा फास पोलिसांकडून आवळला जाण्याची चिन्हे आहेत. आता मात्र कोतवाली पोलिस पुढे काय कारवाई करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नगरमधील (Ahmednagar) शिक्षक विकास भाऊसाहेब गवळी यांनी डिसेंबर 2023 मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे जिल्ह्यातील आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी बदली झालेल्या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मागवली होती. याबाबतचे पत्र पोलिसांकडून डिसेंबर महिन्यात शिक्षण विभागाला दिले.

Teachers
Uddhav Thackeray Matoshri : 'मातोश्री'ला पुन्हा घेरलं! ठाकरेंच्या 'या' जवळच्या व्यक्तीवर गुन्हा

या प्रकरणी जानेवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीचा लाभ घेतलेल्या 2017 ते 2022 या कालावधीतील 118 शिक्षकांची माहिती पोलिसांना सादर केली आहे. शिक्षण विभागाने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये 2017 पासून 2022 पर्यंत आंतरजिल्हा बदलीमध्ये लाभ घेतलेले शिक्षक, त्यांची नावे, संवर्ग आणि बदलीचे ठिकाण याबाबत कळवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वी 2010-11 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये (Zilha Parishad) 76 शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देऊन अपंग योजनेचा लाभ घेतला होता. तसेच बदल्याही करून घेतल्या होत्या. याप्रकरणात चौकशी करून आढळलेल्या दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असून त्याबाबतही अद्याप अंतिम कारवाई झालेली नाही. यामुळे गवळी यांच्या तक्रारीवर पोलिस काय आणि कसा तपास करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Teachers
Chhagan Bhujbal : मोठी बातमी! छगन भुजबळांनी नोव्हेंबरमध्येच दिला होता मंत्रिपदाचा राजीनामा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com