Uddhav Thackeray Matoshri : 'मातोश्री'ला पुन्हा घेरलं! ठाकरेंच्या 'या' जवळच्या व्यक्तीवर गुन्हा

CBI, ED News : सीबीआयकडून गुन्हा दाखल, ईडीही होणार अॅक्टिव्ह
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील मुंबई, पुण्यातील बड्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यामातून कारवाई करण्यात येत आहे. यातच आता ठाकरेंच्या निकटवर्तीय मोठ्या नेत्याच्या जवळील व्यक्तीवरही सीबीआयने कारवाईचा बडगा उगारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिणामी मातोश्रीला पुन्हा घेरण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

राज्यात ठाकरे गटातील अनेक नेते आणि त्यांचे नातेवाईक किंवा जवळील व्यक्तींविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. यात आमदार रवींद्र वायकर, राजन साळवी, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आदींचा समावेश आहे.

Uddhav Thackeray
NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? 15 फेब्रुवारीपर्यंत लागणार निकाल; नार्वेकरांची माहिती

आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) शिलेदार खासदार अनिल देसाई यांचे पीए दिनेश बोभाटे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यानंतर ईडी अॅक्टीव्ह झाली असून बोभाटेंवर मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता बोभाटेंवरील कारवाई, निशाणा मात्र देसाई, अशी चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे प्रकरण ?

बोभाटे 2013 ते 2023 या काळात एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी त्या इन्शुरन्स कंपनीच्या माध्यामातून सुमारे 36 टक्के म्हणजे दोन कोटी 60 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्याने सीबीआय दिनेश बोभाटेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल करताच ईडीकडूनही बोभाटेंविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच उद्धव ठाकरेंसह त्यांचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच आता खासदार देसाईंच्या (Anil Desai) पीएचाही नंबर लागल्याने सरकार 'मातोश्री'ला घेरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal : मोठी बातमी! छगन भुजबळांनी नोव्हेंबरमध्येच दिला होता मंत्रिपदाचा राजीनामा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com