Telangana Assembly Election : 'बीआरएस'चा निवडून आलेला 'तो' आमदार रात्रीतच रेवंथ रेड्डींच्या भेटीला

BRS Vs Congress : खंम्मम जिल्ह्यातील 10 पैकी 9 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय
BRS MLA Meet Rewanth Reddy
BRS MLA Meet Rewanth ReddySarkarnama
Published on
Updated on

Telangana Assembly Election Result 2003 : पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणा राज्याने काँग्रेसला साथ देत के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची 10 वर्षांची सत्ता उलथवून टाकली. काँग्रेस पक्ष 119 पैकी 64 विधानसभा क्षेत्रात विजय मिळवत स्पष्ट बहुमतात आला आहे.

यात रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा जसा आहे, तसा खंम्मम जिल्ह्याचाही आहे. खंम्मम जिल्ह्यातील 10 पैकी 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर एका जागेवर निवडून आलेला बीआरएसच्या विजयी उमेदवाराने काँग्रेस नेत्यांची भेट घेत खळबळ उडून दिली आहे.

खंम्मम जिल्ह्यात पालेर मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडून निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिस्तबद्ध नियोजनाची ख्याती असलेले विनायक देशमुख यांनी केवळ पालेरच नव्हे तर एकूणच खंम्मम जिल्ह्यातील इतरही मतदारसंघात आपल्या कार्यशैलीची झलक दाखवून दिली.

BRS MLA Meet Rewanth Reddy
Mizoram Assembly Elections Results in Marathi: मिझोरमचे मुख्यमंत्री पिछाडीवर; तर उपमुख्यमंत्र्यांचा पराभव

पालेर मतदारसंघात देशमुख यांनी ठरवलेला विजयाचा 'रोडमॅप' इतरही ठिकाणी राबवला गेला असल्याचे बोलले जातेय. मोठ्या लोकसंख्येची गावांवर लक्ष केंद्रित करणे, ग्रामसभा, कार्यकर्त्यांच्या कमिटीच्या नियमित बैठका घेण्यात आल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे बाहेरगावी असलेल्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी नियोजन केले. परिणामी उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आल्याचा दावा देशमुखांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचाच एकूण परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाने खंम्मम जिल्ह्यातील 10 पैकी 9 विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला. तर भद्राचलम येथून निवडून आलेले बीआरएस पक्षाचे विजयी उमेदवार तेल्लम वेंकट राव यांनी रात्री काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंथ रेड्डी (Rewanth Reddy) यांची भेट घेत योग्य ते संकेत दिले. त्यामुळे आता खंम्मम जिल्ह्या काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा देणारा जिल्हा ठरला आहे.

भद्राचलम येथून निवडून आलेले बीआरएस (BRS)चे विजयी उमेदवार तेल्लम वेंकट राव हे मूळ काँग्रेस पक्षाचेच जेष्ठ नेते आहेत. देशमुख निरीक्षक असलेल्या पालेर मतदारसंघातील विजयी उमेदवार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांचेच ते विश्वासू सहकारी होते.

काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांना बीआरएस पक्षाने आपल्याकडे ओढत उमेदवारी दिली होती. मात्र निवडून येताच त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरल्याचे पुढे येत आहे. काँग्रेस नेत्यांच्या भेटीने बीआरएस पक्षात खळबळ उडाली असून आता इतर विजयी उमेदवारांवर लक्ष ठेवण्याची वेळ के.सी.आर. यांच्यावर आल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

BRS MLA Meet Rewanth Reddy
Rohit Pawar : रोहित पवारांना अजितदादा पावले ! कुकडीच्या आवर्तनाबाबत घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com