Ahmednagar Politics : तेलंगणातील भाजप आमदार टी. राजासिंह यांची नगरमध्ये सभा अन् 'एमआयएम' अलर्ट!

BJP Vs AIMM News : भाजप आमदार टी. राजासिंह यांची भाषणे जातीयवाद निर्माण करणारी ठरतात.
BJP Vs AIMM News
BJP Vs AIMM NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले तेलंगणातील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार टी. राजासिंह यांची सोमवारी सायंकाळी सात वाजता नगरमध्ये सभा होत आहे. या सभेपूर्वीच 'एमआयएम'ने नगर प्रशासनाला पत्र देत जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सूचवले आहे. 'एमआयएम'चे नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी हे पत्र दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे आणि विश्व हिंदू परिषदेला 60 वर्षांच्या पूर्तीनिमित्ताने ही सभा होत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणात सभा आयोजित केली आहे. नगर जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश असताना ही सभा होत आहे.

BJP Vs AIMM News
Shrikant Shinde Vs Raju Patil : खासदार श्रीकांत शिंदेंचा आमदार राजू पाटलांना मोठा धक्का; कल्याणमध्ये मनसेला खिंडार

भाजप आमदार टी. राजासिंह (T.Rajasinh) यांची भाषणे जातीयवाद निर्माण करणारी ठरतात. श्रीरामपूरमध्ये काही महिन्यांपूर्वी त्यांचे भाषण झाले होते. तिथेही जातीय तेढ वाढली. आमदार टी. राजासिंह यांची आता नगर शहराच्या मध्यवर्ती भागात सभा आयोजित केली आहे. त्यांच्या भाषणामुळे दोन समाजात दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

अशरफी म्हणाले, आमदार टी. राजासिंह यांचे भाषण म्हणजे, अल्पसंख्याक समाजाविरोधात विष पेरणारे असते. अल्पसंख्याकांविरोधात चुकीचे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार टी. राजासिंह यांनी अल्पसंख्याकांच्या विरोधात 'हेट स्पीच' केल्यास पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परवेज अशरफी यांनी पत्राद्वारे केली आहे.

नगर शहरात(Ahmednagar Politics) गेल्या काही महिन्यांपासून जातीय तेढ वाढीचे प्रकार वाढले आहेत. यातून सामाजिक सलोखा बिघडला आहे. सण-उत्सवाचे दिवस सुरू आहेत. यात पुन्हा जातीय तेढ निर्माण होईल, अशी कृती नगरच्या बाजारपेठेत हानीकारक ठरेल, असेही परवेज अशरफी यांनी म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP Vs AIMM News
Mumbai NCP News: मुंबईसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय; राखी जाधव यांच्यावर सोपवली 'ही' जाबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com