Nashik Crime News : वादग्रस्त पत्रकामुळे नाशिकमध्ये तणाव; पोलिस 'अ‍ॅक्शन मोड'वर

Nashik due to controversial leaflet : शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांनी तातडीने हालचाल करीत दोघांना ताब्यात घेतले आहे.
Nashik due to controversial leaflet
Nashik due to controversial leafletsarkarnama

Nashik Crime News : नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात आज (शनिवारी) पहाटे काही वादग्रस्त पत्रके आढळली.विशिष्ट समाजाला हिणवणाऱ्या या पत्रकामुळे नागरिक संतप्त झाले. या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती होती.

शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांनी तातडीने हालचाल करीत दोघांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिसात तक्रार केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

याबाबत पोलिसांनी Police तातडीने हालचाल करून तपास केला. त्यात एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादातून संबंधितांना अद्दल घडविण्यासाठी हा बनाव घडविण्यात आला असल्याचे समोर आले. या पत्रकात एक इमारत देखील दाखविण्यात आली होती. त्या इमारतीला इजा पोहोचावी म्हणून हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या पत्रकांमध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्यात आले होते. तसेच शहरातील एका मंदिरा बाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता.

Nashik due to controversial leaflet
Rahul Narwekar News : मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाचा दणका; काय आहे प्रकरण?

ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले. पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला. हा जमा घोषणा देखील देत होता. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पंचवटी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दिनेश बर्डेकर यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना समजावून सांगत त्यांना शांत केले. सुमारे 2 तास हे प्रकरण सुरू होते. ते वाऱ्यासारखे शहरात पसरल्याने अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.

मुख्यमंत्री शिंदे नाशिकमध्ये

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde शहरात असल्याने पोलिस सतर्क होते. मात्र एका पत्रकामुळे शहरातील सामाजिक एकोप्याला बाधा पोहोचू नये यासाठी शासन सक्रिय झाले आहे. हा या प्रकाराचा शहरातील विविध राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते.

(Edited By Roshan More)

Nashik due to controversial leaflet
Solapur BJP Meeting : सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत गोंधळ; निरीक्षक धनंजय महाडिकांनाच विचारला कार्यकर्त्यांनी जाब!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com