Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालावर विचारताच मुख्यमंत्र्यांनी जोडले हात अन् दिल्या शुभेच्छा

Thackeray and Shinde Group : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा गुरुवारी निकाल
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Supreme Court Final Decision : शिवसेनेत गेल्या वर्षी फूट पडल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. दरम्यान, ठाकरे गटाने शिंदे गटातील १६ आमदरांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता या प्रकरणी राखून ठेवलेला निकाल दोन दिवसांत कधीही निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालावर राज्यात सध्या उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हात जोडून शुभेच्छा दिल्या आहेत.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News: 'राजभवन'चा अजब दावा ! सत्तासंघर्ष न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत देण्यास दिला नकार

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह काही कायदेतज्ज्ञांनी हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पायउतार व्हावे लागणार असल्याचा दावाही ते करीत आहेत. तर सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील नेत्यांनी विरोधकांच्या वक्तव्यावर टोले लगावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.

Eknath Shinde
Amol Kolhe News: दाल में कुछ काला है! : लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढणार असं कोल्हे ठामपणे का म्हणत नाहीत?

सत्ता संघर्षावर गुरुवारी (ता. ११) पडदा पडणार असल्याचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) सांगितले आहे. ते म्हणले, "त्या १६ आमदारांच्या यादीतील मी एक आमदार आहे. आम्ही कायदेशीर बाबी तपासलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी पडदा पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वजण आपापल्या पद्धतीने मत मांडत आहेत. निकालाची आम्हालाही उत्सुकता आहे."

Eknath Shinde
Supreme Court News : सत्तासंघर्षाच्या युक्तीवादात 'या' दोन गोष्टी ठरल्या होत्या महत्त्वाच्या; निकालावरही त्याचा प्रभाव पडणार?

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निकालाबाबत कसलेही टेन्शन नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर निकाल गुरुवारी लागणार आहे. त्याबाबत आमच्या मानात कसलीही धाकधूक नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री अनैतिक आणि असंवैधानिक आहेत. इतके महिने थांबलो, आता २४ तासांनतर राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे." दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ यांनी मात्र सत्तासंघर्षावर येणाऱ्या निकालावर हात जोडून माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Eknath Shinde
Phaltan News : माढ्यात भाजपच्या निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीकडून 'राम'अस्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावला आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्या डॉ.अमृता यांच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते. तेथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी होणाऱ्या सत्तासंघर्षावरील निकालाबाबत प्रश्न विचारला. न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच हात जोडून 'तुम्हा सर्वांना शुभेच्छा!' म्हणत मुख्यमंत्री जळगाव विमानतळाकडे रवाना झाले.

यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री दादा भुसे, सुधीर मुनगंट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com