Maratha Reservation Survey : राज्य मागासवर्ग आयोगाने सुरू केलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षणाला राज्य सरकारने आणखी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. परंतु नगर जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे काम तांत्रिक अडचणींमुळे संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. नगर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाला गती देण्यासाठी 1 हजार 84 अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहे. (Maratha Reservation Survey in Ahmednagar)
कुणबी प्रमाणपत्र उपलब्धतेसाठी मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने कुटुंब सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू केले आहे. या सर्वेक्षणाला काल राज्य सरकारने आणखी दोन दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. आता हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. नगर जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत 70 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले होते.
दोन दिवसांत उर्वरित सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. मंगळवारी सायंकाळी सर्वेक्षणाचे काम 50 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, अशा गावांची संख्या 664 होती, तर 75 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेल्या गावांची संख्या 713 होती. काही गावांतील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशा प्रगणकांची लगतच्या ठिकाणी नियुक्ती करून, तसेच प्रशिक्षण झालेल्या राखीव कर्मचाऱ्यांना तैनात करून जिल्हा प्रशासन सर्वेक्षणाला गती देत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य गजानन खराटे आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे सतत यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. आलेल्या त्रुटींवर काम करीत सर्वेक्षणाला गती देण्यास प्राधान्य देत आहे. नगर जिल्ह्यात एका प्रगणकाकडून दिवसभरात सुमारे 12 कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. एका प्रगणकास 100 ते 125 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात एकूण 9 लाख 35 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. काल सायंकाळपर्यंत 6 लाख 50 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण झाले होते. यासाठी 11 हजार 300 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आता त्यात आणखी 1 हजार 84 कर्मचारी नव्याने नियुक्त करण्यात आले आहेत.
तांत्रिक अडचणींचा सामना कायम...
दरम्यान, सर्वेक्षण करताना प्रगणकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंब सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने ॲप उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये सर्व माहिती भरावयाची आहे. या ॲपला पहिल्या दिवसापासून तांत्रिक अडचणी जाणवत आहेत. सर्वेक्षण आटोपत आले तरी या अडचणी कायम आहेत.
किती कुटुंबांचे सर्वेक्षण झाले, याची डॅशबोर्डवरील आकडेवारी आजही चुकीची दाखवली जात होती. याशिवाय सर्वेक्षणासाठी निवडलेल्या गावांची नावेदेखील दिसत नव्हती. मोबाइलमध्ये असलेल्या ॲपमध्ये लॉगिन होण्यापासून ते लाॅगआऊट होण्यापर्यंत अनेक समस्या प्रगणकांना येत आहेत.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.