Political News : सत्तासंघर्ष : ''सरकार कोसळणार नाही, 16 आमदार अपात्र झाले तरी धोका नाही''

Chhagan Bhujbal, Sanjay Raut : 'राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार अशी काही परिस्थिती नाही'
Eknath Shinde Latest Marathi News News
Eknath Shinde Latest Marathi News NewsSarkarnama

Chhagan Bhujbal News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरू आहेत, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार अशी काही परिस्थिती नाही आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर हे सर्व अवलंबून आहे. 16 आमदार जरी अपात्र झाले तरी त्यांना 149 आमदारांची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या 165 आमदार आहेत. त्यामुळे सरकार त्यांचे राहील, मुख्यमंत्री बदलू शकतात. मात्र, सरकारला धोका नसल्याचे भुजबळ म्हणाले. रविवारी झालेल्या जळगावच्या सभेतही राऊत यांनी 15 दिवसांत सरकार कोसळणार असे म्हटले होते.

Eknath Shinde Latest Marathi News News
Pune APMC News: बाजार समितीत आमदार मोहिते अ्न शेळकेंची प्रतिष्ठा पणाला; भाजप, काँग्रेस अन् ठाकरे गटाची हातमिळवणी

भुजबळ म्हणाले, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल गेलाच तर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल. मात्र, दुसरा मुख्यमंत्री येईल. पण या जर तरच्या गोष्टी आहे. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. जर तसा निकाल आलाच तर सरकारला 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार त्यांच्याकडे शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील, असे भुजबळ म्हणाले.

Eknath Shinde Latest Marathi News News
Political news : भुसे, राठोड, कदमांनंतर किशोर पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंनी सुरुंग लावला! उमेदवारही ठरला अन्...

दरम्यान, राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीविषयी भाजप नेतृत्व नाराज आहे. त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला. राज्याचे नेतृत्व करण्यात शिंदे अपयशी ठरले आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com