Bazar Samiti Election: कर्जतनंतर जामखेडमध्येही समान जागा; मतदारांनी राम शिंदे-रोहित पवारांना अडकवले, पुढे काय?

Karjat-Jamkhed Bazar Committee Chairman : राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा होणार काँटे की टक्कर, कर्जत-जामखेड बाजार समितीत सभापती कुणाचा होणार?
Ram Shinde, Rohit Pawar
Ram Shinde, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत दिग्गजांनी गड राखला. तर काहींना पराभवाचा धक्का बसला. या बाजार समित्यांच्या निवडणुकीत अहमदनगरमधील कर्जत आणि जामखेड या दोन बाजार समित्यांची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली.

भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कर्जत आणि जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत जोरदार काँटे की टक्कर पाहायला मिळाली. कर्जत-जामखेड या दोन्ही बाजार समित्यांमध्ये राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटाला समसामान अर्थात 9-9 जागा मिळाल्या आहेत.

Ram Shinde, Rohit Pawar
Jamkhed Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा काँटे की टक्कर; कर्जतप्रमाणेच जामखेडलाही मिळाल्या समसमान जागा..

आधी कर्जत बाजार समितीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा जामखेडच्या बाजार समितीतही दोघांमध्ये मोठी चुरस झाली. अखेर कर्जत प्रमाणेच जामखेड बाजार समितीतही राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटाला समसामान 9-9 जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे आता कर्जत बाजार समिती आणि जामखेड बाजार समितीवर कुणाच्या गटाचा सभापती होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कर्जत प्रमाणेच जामखेडच्या जनतेने दोघांनाही समसमान जागा निवडून दिल्यामुळे आता सभापतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ram Shinde, Rohit Pawar
Karjat Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांना समान जागा; सभापती कुणाचा होणार? सुजय विखेंचं मोठं भाष्य

कर्जत-जामखेड या दोन्ही बाजार समितीवर सभापती निवडीसाठी बहुमत लागेल. त्यामुळे बहुमतासाठी संचालकांच्या फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा दोन्ही ठिकाणी सभापती निवडीसाठी ईश्वरी चिठ्ठीचा वापर करण्यात येऊ शकतो. राम शिंदे आणि रोहित पवार यांनी या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली होती. अगदी तशीच ताकद आता सभापती निवडीवेळीही लागणार आहे.

दरम्यान, खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदाबाबत भाष्य केलं होतं. "कर्जत बाजार समितीत सभापती हा भाजपचाच होणार", असं विखे म्हणाले होते. त्यामुळे आता दोन्ही बाजार समीतीत सभापती कुणाचा होणार? यासाठी दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून यात कोण बाजी मारतं? याकडे सर्वांचे लक्ष लगालं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com