Nashik News: शिवसेना (ठाकरे गट) कोणत्याही स्थितीत ड्रग्ज प्रकरण थंड पडू द्यायला तयार नाही. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले होते. आता येत्या २० ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे गट मोर्चा काढून पालकमंत्री दादा भुसे यांना याबाबत प्रश्न विचारणार आहे.
शिवसेनेचा ठाकरे गट शिंदे सरकारला नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना पुन्हा एकदा घेरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी उपनेते, माजी मंत्री बबनराव घोलप, डॉ. अद्वय हिरे यांसह विविध नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठक झाली. या वेळी घोलप यांनी पालकमंत्री तसेच राज्य शासनाला थेट प्रश्न विचारले.
ते म्हणाले, पुण्यानंतर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकनगरीला ड्रगमाफियाच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने २० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात नाशिककरांनी भावी पिढी वाचवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बबन घोलप यांनी केले. मोर्चाच्या माध्यमातून पालकमंत्री दादा भुसे यांची कोंडी केली जाणार आहे.
'नाशिकनगरी ड्रग्जमुक्त करूया, तरुण पिढी वाचवू या' ही टॅगलाइन घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रगमाफियांना प्रोत्साहन देऊन युवा पिढीला बर्बाद करण्याचे काम करणारे, मग ती कितीही मोठी व्यक्ती असली तरी नाशिककर त्यांना कधीच माफ करणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या वेळी उपनेते अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी गटनेते विलास शिंदे, माजी माहापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख कृणाल दराडे, माजी आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.