Prakash Ambedkar : निवडणुकीपूर्वी पुन्हा होऊ शकते नोटबंदी; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar News : इंडिया आघाडीच्या धसक्याने नाव बदलण्याच्या नादात केंद्र सरकार काहीही निर्णय घेऊ शकते, असे आंबेडकर म्हणाले.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar on Demonetisation : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे सरकार पुन्हा एकदा नोटबंदीसारखी स्थिती निर्माण करू शकते, असा इशारा दिला आहे. (Adv. Prakash Ambedkar warns people on demonetisation)

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी धुळे (Dhule) येथील कार्यक्रमात भाजप (BJP) सरकारने ‘इंडिया’ आघाडीच्या नावाचा मोठा धसका घेतल्याचे सांगितले.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : पंतप्रधानांनी जी-२० परिषदेतून देशाची प्रतिष्ठा घालवली!

वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीतर्फे धुळे येथे आदिवासी एल्गार सभा झाली. या वेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, सध्याचे देशातील राजकारण एकतर्फी झाले आहे. त्यात सरकार सामान्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा अजिबातच विचार करायला तयार नाही. त्यामुळे स्थिती गंभीर बनली आहे.

एनसीईआरटीच्या पुस्तकातून इंडियाऐवजी भारत करण्यात आले. हा संदर्भ देत, अॅड आंबेडकर यांनी नोटबंदीसारखी स्थिती पुन्हा एकदा केंद्रातले सरकार करू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, आपल्या सर्वांच्या खिशात नोट असतेच. नोटेवर रिझर्व्ह बँक आफ इंडिया अर्थी इंडिया शब्द असतोच. त्यामुळे तोही बदलला जाऊ शकतो. त्यासाठी कदाचित शब्दश: नोटबंदी नाही, मात्र तशीच स्थिती निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला सावध तर नक्कीच राहावे लागेल.

Prakash Ambedkar
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण; भुजबळांच्या भूमिकेला घरातूनच मिळाले आव्हान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com