Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण; भुजबळांच्या भूमिकेला घरातूनच मिळाले आव्हान!

Maratha Reservation : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी संजय पवार यांनी भुजबळ यांनी साथ सोडत पक्ष आणि बाजार समिती सभापतिपद सोडले.
Chhagan Bhujbal & Sanjay Pawar
Chhagan Bhujbal & Sanjay PawarSarkarnama
Published on
Updated on

Manmad Political News : सध्या मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे हे एकाच सरकारमध्ये आहेत. भुजबळ कांदे यांच्याशी वाद करायला तयार नाही. त्यासाठी आम्हाला पुढे करून वापर केला जातो. भुजबळांनी सत्तेत सहभागी व्हायचे, आम्ही विरोधकांशी लढायचे हे अजिबात मान्य नसल्याने त्यांची साथ सोडल्याचा बेधडक आरोप माजी आमदार संजय पवार यांनी केला आहे.

मनमाड बाजार समितीत (Nandgaon) तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गटाला जोरदार हादरा बसला आहे. याबाबत माजी आमदार संजय पवार (NCP) यांनी भुजबळ सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले.

Chhagan Bhujbal & Sanjay Pawar
Prakash Ambedkar : पंतप्रधानांनी जी-२० परिषदेतून देशाची प्रतिष्ठा घालवली!

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मराठा समाजात असंतोष आहे. विशेषतः तरुण वर्गात त्याबाबत नाराजी आहे. त्यामुळे जो मराठा भुजबळांबरोबर जातो त्याला प्रश्न केले जातात. त्याचे पडसाद नांदगाव मतदारसंघात उमटले आहेत. भुजबळ यांना त्यांच्या गटातूनच आव्हान मिळाले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका मान्य नाही. मराठा समाजातील अनेकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भुजबळांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मनमाड बाजार समितीचे सभापती तसेच माजी आमदार संजय पवार यांनी पक्ष व सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे नांदगाव मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

याबाबत माजी पवार यांनी बाजार समितीतील भुजबळ गटाचे संचालक तसेच पक्षाच्या नेत्यावंर देखील टिका केली. संचालक विठ्ठल आहेर यावेळी उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड मला जाणून बुजून त्रास देत होते. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

Chhagan Bhujbal & Sanjay Pawar
Maratha Arakshan News : आरक्षणाची धग बीडमध्ये कायम; बस जाळली, जिल्हाभर चक्काजाम !

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांची भूमिका स्पष्ट नाही. त्यांचा आरक्षणाला विरोध पाहून अनेक मराठा तरुण आक्रमक झाले आहे. भुजबळ हे केवळ देखावा आहे. ते विरोध घ्यायला तयार नाही. आम्हाला विरोध म्हणून पुढे केले जाते. ते तडजोडी करतात, मात्र आम्हाला दोष दिला जातो. त्याला कंटाळून त्यांच्यापासून बाजूला होत आहे.

Chhagan Bhujbal & Sanjay Pawar
Pratap Patil : मराठा आंदोलकांनी खासदार प्रताप पाटलांच्या गाड्या फोडल्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com