ही तर देशात स्वातंत्र्याची दुसरी लढाई!

आमदार कुणाल पाटील यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
MLA Kunal Patil
MLA Kunal PatilSarkarnama

धुळे : देशाची अस्मिता, (Nation`s identity) अखंडता, संविधान, (Constitution) लोकशाही (Democracy) धोक्यात आली असून जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देश वाचविण्यासाठी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू केली आहे. ही माणसं जोडणारी यात्रा आहे. त्यामुळे सर्वांनी भारत जोडो या यात्रेसह चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे (Congress) प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी केले. (MLA Kunal Patil appeal party workers to join Bharat Jodo Yatra In maharashtra)

MLA Kunal Patil
...आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली!

येथील बर्वे कन्या छात्रालयाच्या प्रांगणात भारत जोडो यात्रेनिमित्त समविचारी पक्ष आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

MLA Kunal Patil
शिवसेनेच्या व्यासपीठावर `राष्ट्रवादी`ची तुफान फटकेबाजी

भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला राज्यात येत आहे. नांदेड येथे जिल्ह्यातून काँग्रेससह समविचारी पक्ष, संघटनांचे शेकडो कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील. याअनुषंगाने बैठक झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. श्री. पाटील, श्रीमती शिंदे यांनी भारत जोडो यात्रा काँग्रेसची नसून देश वाचविण्यासाठी खासदार गांधी यांनी पुकारलेला लढा असल्याचे सांगितले.

यात्रेचे जिल्हा समन्वयक आमदार चौधरी यांनी देशाच्या अस्तित्वासाठी यात्रा निघाली असल्याचे सांगितले. डॉ. देशमुख यांनी देशात भाजपची सत्ता आली आणि देश पारतंत्र्यात गेल्याची टीका करत लोकशाही वाचविण्यासाठी राजकारणविरहीत ही यात्रा असल्याचे सांगितले.

यावेळी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, आमदार शिरीष चौधरी, प्रतिभा शिंदे, रमेश दाणे, अविनाश पाटील, श्यामकांत सनेर, डॉ. अनिल भामरे, युवराज करनकाळ, अ‍ॅड. एम. एस. पाटील, अ‍ॅड. श्यामकांत पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, पोपटराव चौधरी, एम. जी. धिवरे, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com