Lok Sabha Election 2024: यंदा महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही, ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

Dhule Lok Sabha Constituency: "या सरकारला पुन्हा निवडून द्यायचं नाही. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघनखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही."
Amit Saha, Narendra Modi, Udddhv thackeray
Amit Saha, Narendra Modi, Udddhv thackeray Sarkarnama

Uddhav Thackeray On Narendra Modi: महाराष्ट्राने तुम्हाला दोन वेळेस 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले होते. परंतू यावेळेस महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहांवर (Amit Shah) हल्लाबोल केला आहे. ठाकरे आज धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Sobha Bachhav) यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

या सभेत बोलताना ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शोभाताई बच्छाव या उद्याच्या खासदार आहेत. तसेच शोभाताई तुम्ही योग्य वेळी उमेदवारी घेतली, मागील 10 वर्ष ज्यांना तुम्ही निवडून दिलं होतं त्यांचं नातं धुळेकरांनी पाहिलं आहे. समोरचे उमेदवार सुरुवातीला आमच्याकडे होते पण ते गद्दार आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुभाष भामरेंवर निशाणा साधला. तसेच दोन वेळा खासदार झाल्यानंतर त्यांना धुळे त्यांची खाजगी मालमत्ता वाटायला लागली होती असंही ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही

ठाकरे म्हणाले, "नगरमध्ये मोदींची सभा झाली. त्यांच्या भाषणावरून त्यांच्यावर आई-वडिलांनी संस्कार केले आहे की नाही? असा प्रश्न मला पडला आहे. मोदी तुम्ही कुठून आलात. तिथले संस्कार आम्हाला माहिती नाहीत. परंतु, महाराष्ट्रातल्या मातीतले संस्कार आम्हाला माहितेयत. मोदीजी (Narendra Modi) महाराष्ट्राने तुम्हाला दोनदा 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले. म्हणून तुम्ही दिल्ली पहिलीत. परंतू यावेळेस महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही."

Amit Saha, Narendra Modi, Udddhv thackeray
Dhule Constituency 2024 : 'मी खानदेश कन्या, धुळे माझी जन्मभूमी' शोभाताई बच्छावांनी विरोधकांवर डागली तोफ

मोदी सरकार थापेबाज

मोदी सरकार थापेबाज सरकार आहे. या सरकारला पुन्हा निवडून द्यायचं नाही. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघनखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं म्हणत ठाकरेंनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com