Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama

Sinnar APMC News : `या`मुळे निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना धक्का?

सिन्नरच्या ‘त्या’ आठ संस्थांचा मुद्दाच सिन्नर बाजार समितीच्या निकालात निर्णायक
Published on

Sinnar APMC election : सिन्नर बाजार समितीत निवडणूकीत आठ सहकारी संस्थांमधील ९६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही अन्‌ हाच मुद्दा सहकारातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. माजी आमदार राजाभाऊ वाजे गटासाठी फायदेशीर ठरलेल्या या मुद्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांनाही सत्ता राखता आलेली नाही. (Those 8 society`s 96 voters not able to cast there vote)

सिन्नर (Sinnar) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची सत्ता अधांतरी आहे. शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि कोकाटे यांना या निवडणुकीत समसमान नऊ जागा मिळाल्या आहेत.

Manikrao Kokate
Dhule APMC News: आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचा धुव्वा उडवला!

संबंधीत आठ सहकारी संस्थांमधील सभासदांचा मुद्दा तब्बल दहा वर्षांपासून गाजत आहे. सिन्नर बाजार समिती निवडणुकीत कोकाटे व वाजे गटांनी समसमान जागा जिंकल्या. त्यात, सहकारी संस्थांच्या गटातील अकरापैकी आठ जागा कोकाटे गटाने व तीन जागा वाजे गटाने जिंकल्या. मात्र, संबंधीत ९६ मतदारांना हक्क बजावता आला असता, तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते, असे आता बोलले जात आहे.

कारवाडी, गोंदे, पाटपिंप्री, पाथरे बुद्रुक, पंचाळे, बारागाव पिंप्री, मानोरी, विंचूर दळवी या आठ गावांतील या संस्था आहेत. अंतिम यादीत येथील ९६ मतदारांची नावे वगळली गेली.

Manikrao Kokate
Nandgaon APMC News : छगन भुजबळ यांनी सुहास कांदेची पुरती दमछाक केली

दहा वर्षे लढा

विशेष म्हणजे, मागील पंचवार्षिकमध्येही या आठ सोसायट्यांच्या सभासदांचा मुद्दा चर्चेत होता. मात्र, त्यावर न्यायालयाने तेव्हा निकाल दिलेला नव्हता. यामध्ये २०१३ ते २०१५ या कालावधीत वाजे गटाने सहकार विभाग ते न्यायालय असा लढा दिला. त्यावर विकास संस्थेचे वर्गीकरण करता येणार नाही, असे न्यायालयाने बजावले. तर, २०२० मध्ये पुन्हा सहा संस्थांच्या वर्गीकरणासाठी कोकाटे गटाने सहकार विभागापासुन सुरवात केली. लढा पुन्हा न्यायालयात गेला असतानाच, निवडणुकही संपली अन्‌ निकालही जाहीर झाले. त्यामुळे या आठ संस्थांच्या वर्गीकरणाचा मुद्दा कायदेशीर प्रक्रियेत गाजत राहणारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com