Chhagan Bhujbal News: संभाजी भिडेंवरील विधानानंतर भुजबळांना धमकी; पोलीस प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Political News: भुजबळ यांच्या कानाखाली देणाऱ्याला एक लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावरील केलेल्या विधानानंतर भुजबळांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली होती. भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार, अशी घोषणा करत परशुराम सेवा संघाच्या एका कार्यकर्त्याने धमकी दिली होती. यानंतर आता भुजबळांच्या सुरक्षेत पोलीस प्रशासनाकडून वाढ करण्यात आली आहे.

"ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, तर संभाजी भिडेंचे नाव संभाजी कसे, याचे स्पष्टीकरण द्यावे", असे विधान भुजबळांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर भुजबळांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Chhagan Bhujbal
Rajni Patil News : रजनी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर नियुक्ती

"जो कुणी भुजबळांच्या कानाखाली मारेल त्याला एक लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल", अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे विश्वजीत देशपांडे यांनी केली होती. त्यानंतर "अशा धमक्यांना आपण घाबरत नाहीत", असे भुजबळ म्हणाले होते. मात्र, या धमकीनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com