Tribal Politics: आदिवासी नेते आमदार, खासदारांवर कार्यकर्ते संतापले, बंजारा,धनगर समाज 'एसटी' प्रवर्गात नकोच!

Banjara Dhangar reservation protest: आदिवासी समाज एकवटला, आरक्षणाच्या प्रश्नावर अचानक शहरात काढला एल्गार मोर्चा.
Tribal Leaders Face Backlash | Banjara & Dhangar ST Row
Tribal Leaders Face Backlash | Banjara & Dhangar ST RowSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Tribal News: आदिवासी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा विषय आता आमदार खासदार आणि राजकीय नेत्यांच्या हातून निसटला. आदिवासी समाज या प्रश्नावर एकवटला आहे.

राज्यातील बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी एसटी आरक्षण देण्यास विरोध वाढला आहे. या संदर्भात राज्यातील आदिवासी समाज एकवटला. नाशिकला या प्रश्नावर अचानक झालेल्या शक्ती प्रदर्शनाने प्रशासनाची धावपळ उडाली.

बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये. या प्रश्नावर सकल आदिवासी समाज रस्त्यावर उतरला. आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली नाशिकला मोठे आंदोलन झाले.

Tribal Leaders Face Backlash | Banjara & Dhangar ST Row
Shivsena UBT News: नाशिक शहरातही वोट चोरी? शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने शोधली साडे तीन लाख दुबार नावे!

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही आदिवासी राजकीय नेता, आमदार, खासदार त्यामध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे या नेत्यांनी आदिवासी आमदार आणि खासदारांवर तीव्र संताप व्यक्त केला. आदिवासींच्या मतांवर निवडून गेलेले तोंड उघडण्यास तयार नाही, असा आरोप संघटनेचे लकी जाधव यांनी यावेळी केला.

Tribal Leaders Face Backlash | Banjara & Dhangar ST Row
Sharad Pawar vs Ajit Pawar faction Parner : पारनेरमध्ये पवारविरुद्ध पवार, अजितदादांची राष्ट्रवादी साहेबांच्या शिलेदाराशी भिडणार? राणी लंके 'झेडपी'च्या रिंगणात?

राज्यातील २५ आमदार चार खासदार आणि मंत्री आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मंत्री नरहरी झिरवाळ आश्वासने देतात मात्र प्रश्न सुटत नाही. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके समाजाच्या प्रश्नावर मौन आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाला आक्रमक होण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

नाशिकसह नांदेड आणि अन्यत्र आदिवासींची आंदोलने सुरू आहेत. राज्यातील सत्ताधारी आदिवासींचे कोणतेही प्रश्न सोडविण्यास तयार नाही. प्रश्न सोडविणे ऐवजी आरक्षणाच्या विषयावरून समाजात आणि जातीत भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.

भीमराव किरण, आमश्या पाडवी, राजेश पाडवी यांसारखे मोजके आमदार वगळता आदिवासींच्या प्रश्नांवर समाजातील लोकप्रतिनिधी सक्रिय नाहीत. मुख्यमंत्री आणि नेत्यांकडे गेल्यावर शुभेच्छा देण्यापलीकडे फारसे काम होत नाही. हे लोकप्रतिनिधी फक्त मतदारसंघात निधी कसा मिळेल त्याची चिंता करीत असल्याची टीका यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली.

एकंदरच काल नाशिकला अचानक निघालेल्या मोर्चाने आदिवासी समाजाचे प्रश्न बिकट होत असल्याचे चित्र आहे. मोर्चात देखील राजकीय नेत्यांऐवजी सामाजिक संघटना अग्रेसर होत्या. त्यामुळे आदिवासी समाजाचे नेतृत्व आणि प्रश्न राजकीय नेत्यांच्या हातून निसटले, असे चित्र आहे.

नाशिकच्या मोर्चात लकी जाधव, शिवाजीराव ढवळे, आप्पाराव काळे, सुनील काळे, गणेश गवळी, जीवन भोळे, संदीप गवारी आदी नेते नेतृत्व करीत होते. या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बसून घेतले. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या वाहतुकीची कोंडी दूर करताना पोलिसांची तारांबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com