Nandurbar News; डोकारे कारखान्याच्या निकालाची अमित शहांकडून दखल

डोकारे कारखान्यातील अन्यायाचे दिवस संपल्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
Bharat Gavit & Amit Shaha
Bharat Gavit & Amit ShahaSarkarnama

नवापूर : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एकमेव असलेल्या डोकारे येथील आदिवासी (Trible) सहकारी साखर कारखान्यातील अन्यायाचे दिवस संपले असून, आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या (Farmers) हक्काचे दिवस सुरू झाले आहेत. नवापूर कारखान्यातील पंचवीस वर्षांची सत्ता भरत गावित यांनी खालसा केली. याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी विशेष दखल घेतली, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. (Dr. Vijaykumar Gavit felicitate newly elected directors of sugar factory)

Bharat Gavit & Amit Shaha
Yuva Sena : युवा सेनेच्या नियुक्त्यांवरून ठाकरे गटात नाराजीनाट्य!

ऊस उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी साखर उत्पादन, इंधन उत्पादन या संबंधित तसेच विविध प्रकारचे अनुदान मिळविण्यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास खात्याकडून, तसेच केंद्र सरकारच्या सहकार विभागातून पुरेपूर सहकार्य मिळवून दिले जाईल, असे खासदार डॉ. हीना गावित यांनी आश्वासन दिले.

Bharat Gavit & Amit Shaha
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथांची कमाल : मुंबईत आले अन् तब्बल पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले!

डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया बुधवारी (ता. ४) पार पडली. यात कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत माणिकराव गावित यांची, तर उपाध्यक्षपदी जगन कोकणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

‘अमित शहा यांच्याकडून दखल’

खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले, की केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी स्वतः येथील परिवर्तनाची दखल घेतली असून, त्यांच्या माध्यमातून कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. इथेनॉल निर्मितीसारखे प्रकल्प असो की साखर उत्पादन वाढीसंदर्भातील उपाययोजना असोत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहकार्य मिळविता येईल. ऊस उत्पादकांच्या खात्यात सरळ रक्कम जमा होईल. असे उपाय केंद्र सरकारनेच केलेले आहेत. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादकांच्या प्रगतीसाठी वेगाने काम करणे आता निश्चितच शक्य होणार आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गावित व उपाध्यक्ष जगन कोकणी आणि संचालक मंडळाचा सत्कार सोहळा भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित बोलत होते.

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शेतकरीहिताविरोधात राबविल्या गेलेल्या कारभारातून कारखान्याची मुक्तता व्हावी आणि आदिवासी ऊस उत्पादकांना त्यांचा खरा हक्क मिळवून द्यावा हा प्रयत्न पूर्वीपासूनच होता, असे स्पष्ट केले. फक्त या आदिवासी सहकारी कारखान्यालाच नाही तर जिल्ह्यातील इतर सहकारी कारखान्यांनादेखील आपण कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवून दिले. यापुढेदेखील शेतकरीहिताच्या कामावर आपला भर राहील कारखान्याला पूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले.

नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गावित यांनी मान्यवरांसह उपस्थितांचे आभार मानत अत्यंत भावुक मनोगत व्यक्त केले. मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हीना गावित यांच्या नेतृत्वावर आमचा सर्वांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. यांच्याशिवाय आम्हाला हे परिवर्तन घडविणे शक्य नव्हते. तथापि, जनसमुदायाच्या हिताचे राजकारण करीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आम्हाला शक्ती पुरविली. आता यापुढे ऊस उत्पादकांच्या हक्काचा कारखाना चालविला जाईल, असे भरत गावित म्हणाले.

डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार शरद गावित यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार निर्मला गावित, उपाध्यक्ष जगन कोकणी यांनी मतदारांचे आभार मानले. या वेळी व्यासपीठावर डॉ. हीना गावित, इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार शरद गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, बकाराम गावित, सीताराम ठाकरे, आलू गावित, रमेश गावित, रुद्रा वसावे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ तसेच निवृत्त अभियंता रमेश गावित, नगरसेवक गिरीश गावित, नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित, पंचायत समिती सदस्या सुमन गावित व शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com