Kumbh Mela News : 'एनएमआरडीए' विरोधी आंदोलनात मनसेची उडी; गिरीश महाजन थेट टार्गेट

MNS Dinkar Patil extended support to the farmers of Trimbakeshwar : विकासाला विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांना रस्त्यावर का आणता? संकटग्रस्तांचा प्रश्न.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Dinkar Patil News : कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत 100 मीटर जमीन मोकळी केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची घरे व बांधकामे पाडण्यात आली. या विरोधात अकरा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची स्थिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एनएमआरडीए' कारवाईला तोंडी स्थगिती दिली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना प्रत्यक्ष स्थिती पाहण्याची सूचना केली. मात्र गेल्या आठवड्याभरात मंत्री महाजन इकडे फिरकलेच नाही.

शेतकऱ्यांवरील (Farmer) कारवाईच्या निषेधार्थ कैलास खांडबहाले आणि त्यांचे सहकारी गेल्या 11 दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा आहे. शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

यासंदर्भात परिसरातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा झाला. मेळाव्याला दिनकर पाटील, माजी नगरसेवक सलीम शेख, ॲड प्रभाकर खराटे, रतनकुमार इचम हे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी संघटीत व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संकटात असून रस्त्यावर आले आहेत. राज्य सरकार त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना नाशिकच्या उध्वस्त शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी खंत दिनकर पाटील यांनी व्यक्त केली.

Girish Mahajan
Rohit Arya planned crime : मुलांना ओलीस ठेवण्याचा सुनियोजित कट, तीन महिन्यांपासून तयारी; लेखक, दिग्दर्शक रोहित आर्याची रंगीत तालीम

तळेगाव येथे दामोदर पॅलेस त्रंबक रोड येथे बैठक झाली. त्यात त्रंबक रोडवरील साधु-संत तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.घरे व इमारती पाडलेल्या शेतकरी उत्तमराव खांडवाले, नवनाथ कोठुळे, संपतराव चव्हाण, शिवाजी कसबे, महंत राहुल महाराज, महंत आचार्य महाराज समवेत शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते.

Girish Mahajan
Shirdi Nagarparishad election : मंत्री विखेंच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा 'निशाणा'; लोखंडेंची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात?

यावेळी रस्ता रुंदीकरणासाठी एनएमआरडीए ने शंभर मीटर जमिनीची अट शिथिल करावी. रस्त्याच्या मध्य भागापासून ५० मीटर जमिनी घ्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या जेवढ्या रस्ता करू शकते तेवढ्याच करावा अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा. सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलनात यावे, असे आवाहन करण्यात आले.

या आंदोलनात आता मनसेने उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारला फुकटात लाटायच्या आहेत. हे कदापी होऊ दिले जाणार नाही. सरकारने जमिनी हवे असल्यास पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. याबाबत कायदेशीर लढाई करण्याची तयारी देखील आहे. त्यासाठी मनसे राजकीय आणि आर्थिक पाठबळ देईल, असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com