Keralam Assembly Elections: महाराष्ट्राच्या भाजप टीमने केरळच्या विधानसभा निवडणुकीत यंदा भोपळा फोडण्यासाठी कंबर कसली!

Maharashtra BJP team campaign in Kerala elections: केरळमच्या प्रचारात भाजपची नाशिकच्या नेत्यांची टीम विशेष सक्रिय, बुथ यंत्रणा भक्कम करण्यावर दिला भर!
Dr-Bharti-Pawar
Dr-Bharti-PawarSarkarnama
Published on
Updated on

BJP attempt to win seats in Kerala assembly election: केरळम विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसच्या या परंपरागत राज्यात यंदा भाजप हा तिसरा भिडू म्हणून चर्चेत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरला आहे. 

भारतीय जनता पक्षाने केरळम राज्याच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी खासदार विनोद तावडे यांच्याकडे सोपविली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. केंद्रातील सत्तेचा उपयोग या निवडणुक प्रचारात पक्ष करीत आहे. 

खासदार तावडे यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना केरळम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी केले आहे. या टीम कडे बँक ऑफिसची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रचार यंत्रणेत स्थानिक नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

Dr-Bharti-Pawar
Vinod Tawde news : राज्यसभा बिनविरोध, आता विनोद तावडे पुढच्या लढाईसाठी सज्ज; तारखा जाहीर होताच म्हणाले, भाजप सत्तेत येईपर्यंत...

माजी केंद्रीय मंत्री डॉ भारतीताई पवार यांनी आलाफूजा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेले तीन आठवडे त्यांनी सर्व विधानसभा मतदारसंघांच्या नियोजनासाठी प्रचार यंत्रणा सक्रिय केली. त्यामुळे वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झाल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला.

Dr-Bharti-Pawar
Kerala Assembly Election : केरळमध्ये कमळ फुलविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील 87 नेत्यांवर; लुंगी नेसून नेते उतरले प्रचाराच्या आखाड्यात

महाराष्ट्रातील तीसहून अधिक आमदार आणि काही खासदार भाजपसाठी केरळमच्या प्रचारात सहभागी झाले आहे. पूर्णवेळ प्रचारात ते कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री डॉ भारती पवार, नाशिकच्या आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महेश हिरे, डॉ वैभव महाले, राजेश दराडे, योगेश मैद, ज्योती कवर आधी पदाधिकारी गेले दोन आठवडे तळ ठोकून आहेत. 

या राज्याच्या प्रचारात भाजपने यंदा कुटुंब केंद्रित यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी 'कुटुंब योग' मोहीम राबविण्यात येत आहे. अन्य राज्यातील कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून काम करीत आहेत.

भाजपच्या शक्ति केंद्र यंत्रणे प्रमाणे केरळम येथेही यंत्रणा राबविली जात आहेत. त्यात बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची नियुक्ती आणि त्यांना सक्रिय केले जात आहे. याबाबतची जबाबदारी बाहेरच्या राज्यातून गेलेल्या कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मतदान वाढविण्यावर त्यांचा भर असे. 

राज्यात डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष हे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. यामध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाही. त्यादृष्टीने भाजपने आपली नेहमीची यंत्रणा आणि खास तंत्र राबविले आहे. त्यात साधनसामग्रीची रेलचेल आहे. भोपळा फोडणे हे यंदाच्या निवडणुकीत भाजपचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

येथील निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली आहे. स्थानिक नेते के अण्णामलाई यांच्यावर पक्षाची दारोमदार आहे.त्यामुळे भाजपला या निवडणुकीत विशेष अपेक्षा आहेत. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com