Dhule Congress : ऐन लोकसभेत धुळ्यात काँग्रेसला धक्का; प्रदेश सरचिटणीस झाल्यानंतर दोन दिवसांतच तुषार शेवाळे भाजपवासी

Tushar Shewale Join BJP : डॉ. तुषार शेवाळे यांनी धुळे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्याने नाराज त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ऐन प्रचाराच्या काळात शेवाळेंनी भाजपात गेले आहेत.
Tushar Shewale Join BJP
Tushar Shewale Join BJPSarkarnama
Published on
Updated on

Dhule Congress News : लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्याचा प्रचार थंडावला असून मतदान १३ मे रोजी होत आहे. तर धुळे लोकसभा मतदारसंघाचे मतदान पाचव्या टप्प्यात २० मे रोजी होणार आहे. तत्पुर्वीच बेसावध काँग्रेस पक्षाला धुळ्यात मोठा धक्का बसला आहे. या मतदानाच्या महत्त्वाच्या काळातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. तुषार शेवाळे Tushar Shewale यांनी धुळे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्याने नाराज त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ऐन प्रचाराच्या काळात शेवाळेंनी भाजपात गेले आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १२) धुळे येथे हा प्रवेश झाला. यावेळी तुषार शेवाळे यांना योग्य संधी दिली जाईल. त्यांच्या प्रवेशाने धुळे मतदारसंघात भाजपला लाभ होईल, असे मत बावनकुळेंनी व्यक्त केले.

डॉ. तुषार शेवाळे हे धुळे मतदारसंघातील Dhule पक्षाचे इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या. सहा महिन्यांपूर्वी भाजपचे बावनकुळे यांच्याशी त्यांची गोपनीय बैठक झाली होती. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जाते. त्याची तक्रार आल्याने शेवाळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे कळते. त्यानंतर शेवाळेंची समजूत घालण्याचा प्रयत्न स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांनी केला होता.

Tushar Shewale Join BJP
Lok Sabha Election 2024: पुलवामा हल्ल्यावेळी PM मोदी..., भास्कर जाधवांची बोचरी टीका

गाफील काँग्रेस नेते

शेवाळे गेले काही महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात होते, हे लपून राहिलेले नाही. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर माजी आमदार शिरीष कोतवाल Shirish Kotwal यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दोनच दिवसांपूर्वी शेवाळे यांची समजूत घालून त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यासाठी कोतवाल यांनी पुढाकार घेतला होता. डॉ. शेवाळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. मात्र त्यांच्या संशयास्पद वागणुकीमुळे काँग्रेसने त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले होते. त्यानंतर शेवाळेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस नेते आणि उमेदवार डॉ. शोभा बच्छाव गाफील राहिले. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी डॉ. शेवाळे यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मतदानाच्या काही दिवस आधी शेवाळे यांनी संशयास्पद रित्या आपल्या प्रचार थांबविला होता, असा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Tushar Shewale Join BJP
Beed Lok Sabha : पंकजा मुंडेंसाठी मोदी, गडकरी, अजितदादांची बॅटिंग; पण फडणवीस बीडकडे फिरकलेच नाहीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com