Karjat Jamkhed MIDC : कर्जतमध्ये MIDC होणार; 400 हेक्टर जमिनीला प्राथमिक संमती, ग्रामस्थांनी मानले राम शिंदेंचे आभार

Ram Shinde and Uday Samant : कर्जत एमआयडीसीसाठी नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतची 400 हेक्टर कोरडवाहू जमीन, ग्रामस्थांनी मानले सरकारचे आभार
Ram Shinde, Uday Samant
Ram Shinde, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News :

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीच्या जमिनीचा तिढा आता सुटल्यात जमा आहे. या संदर्भात काल (28 फेब्रुवारी) मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागाच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव हद्दीतील जागा प्रस्तावित करण्यात आली. साधारणता 400 हेक्टर कोरडवाहू जमीन या भागात उपलब्ध असून ती नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. दोन वर्षांपासून जागेसाठी जमिनीचा तिढा सुरू असून लवकरच या वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

Ram Shinde, Uday Samant
Nashik Defence Cluster : उद्योगमंत्र्यांचं नाशिककडे दुर्लक्ष, मात्र फरांदेंच्या मध्यस्थीनंतर फडणवीसांनी दिलं लक्ष, अन्...

250 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्याने महामंडळाचे जॉईट सीईओ भंडारी या जमिनीचा भू-अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर तो अहवाल हाय पॉवर समितीपुढे सादर केला जाईल. नियोजित एमआयडीसीच्या जागेबाबत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

MIDC संदर्भातील पुढील प्रक्रिया थोड्याच कालावधीत पूर्ण केली जाईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिला. कर्जत एमआयडीसीच्या (Karjat MIDC) काही तांत्रिक बाबीची पूर्तता आवश्यक आहे. सदरचा भाग हा अवर्षण प्रवण असून या ठिकाणी कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. औद्योगिक वसाहतीमुळे या भागाचा निश्चित कायापालट होणार आहे. कोंभळी, रवळगाव आणि थेरगाव भागात एमआयडीसी व्हावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे आग्रही होते. त्यांनीच सुचवलेली जागाच काल प्रस्तावित झाली आहे.

या अवर्षण प्रवण भागात कर्जत एमआयडीसीसाठी जागा प्रस्तावित झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आदीचे तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. या बैठकीसाठी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, सचिन पोटरे, संचालक नंदकुमार नवले, पप्पू धोदाड, गणेश क्षीरसागर, महेश तनपुरे, तात्यासाहेब खेडकर, दत्ता मुळे, नंदलाल काळदाते, गणेश पालवे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर कायापालट होणार

कोंभळी, रवळगाव आणि थेरवडी भागातील जागेची निवड एमआयडीसीसाठी निवड झाली आहे. ही एमआयडीसी प्रत्यक्षात झाली तर आमदार राम शिंदेंद्वारे शाश्वत विकासाची गंगा या अवर्षण प्रवण भागात येईल. या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे कायमस्वरूपी कल्याण होईल. अल्पभूधारक, कोरडवाहू, दुष्काळी परिस्थिती, शेतीसाठी पाणी येण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये औद्योगिक वसाहत उभी राहण्याने या भागाचा विकास होणार आहे.

लगतची मिरजगाव बाजारपेठ विकसित होईल. यासह जवळच मराठवाडाची हद्द आहे त्यांना देखील अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. तिन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने आमदार राम शिंदे आणि महायुतीच्या सरकारमधील सर्वांचे तापकीर आणि खरमरे यांनी आभार मानले आहेत.

आमदार रोहित पवारांची हक्कभंगाची सूचना

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) मौजे पाटेगाव-खंडाळा भागात कर्जत एमआयडीसीसाठी आग्रही होते. याबाबत त्यांनी पाठपुरावा करीत वेळप्रसंगी आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र राजकीय द्वेषामुळे त्यांना यश आले नाही. बुधवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात या संदर्भात बैठक असताना लोकप्रतिनिधी नात्याने त्यांना बोलवण्यात आले नाही. तसेच सरकारकडून त्यांना तशी सूचना देखील न दिल्याने या निंदनीय प्रकाराची आमदार पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना पत्र देत हक्कभंगाची सूचना मांडण्यास परवानगी मिळावी, असे पत्र दिले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Ram Shinde, Uday Samant
Shrirampur Municipal Council : मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर विखे अन् काँग्रेसच्या आमदारात श्रेयवादाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com