Shrirampur Municipal Council : मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर विखे अन् काँग्रेसच्या आमदारात श्रेयवादाची लढाई

CM Eknath Shinde Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या 'या' योजनेला मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मंजूर दिल्यानंतर विखे-पाटील आणि आमदार लहू कानडे समोरा-समोर आले आहेत.
lahu kande radhkrishna vikhe patil eknath shinde
lahu kande radhkrishna vikhe patil eknath shindesarkarnama
Published on
Updated on

नगररचना सहायक संचालक कार्यालयानंतर आता श्रीरामपूर नगरपरिषदेच्या 178 कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मिळालेल्या प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil ) व आमदार लहू कानडे ( Mla Lahu Kande ) यांच्यात श्रेयवादाची लढाई पुन्हा रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

lahu kande radhkrishna vikhe patil eknath shinde
Sudhakar Badgujar New Chief Shivsena UBT : शहरी जिल्हाप्रमुख शिवसेनेच्या ठाकरे गटाला तारक की मारक?

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या ( Shrirampur Municipal Council ) पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर अमृत फेज-टू या कामांना मंगळवारी नगरविकास विभाग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी प्रशासकीय मान्यता दिली. याबाबत लवकरच शासन निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत फेस-टूच्या पूर्वीच मंजूर झालेल्या या कामाच्या डीपीआरला जानेवारी 2024 मध्ये 178 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली होती. तेव्हापासून आमदार कानडे सातत्याने मंजुरीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रयत्न करीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीरामपूर शहरातील वाढती लोकसंख्या व पुढील पंचवीस वर्षासाठी आवश्यक श्रीरामपूरकरांची पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत फेस-टू तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये मिलतनगरच्या माती तलावाची क्षमता वाढ व संपूर्ण काँक्रिटीकरण हा मुख्य भाग आहे. जुने जलशुद्धीकरण केंद्रऐवजी 25 एमएलटीचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन दोन जलकुंभही बांधण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकण्याचा त्यात समावेश आहे, अशी माहिती आमदार कानडे यांनी विधिमंडळातून दिली.

lahu kande radhkrishna vikhe patil eknath shinde
Manikrao Kokate News: आमदार कोकाटे अन् राजाभाऊ वाजे गटाला इशारा, तिसरी शक्ती 'उदयास' येणार?

दरम्यान, केंद्र शासन पुरस्‍कृत अमृत-२ अभि‍यानाची अंमलबजावणी राज्‍यामध्‍ये मागील काही वर्षांपासून सुरु आहे. सदर अभियानाअंतर्गत राज्‍यातील सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्‍यावर भर देण्‍यात आला आहे. यामध्‍ये श्रीरामपूर नगरपरिषदेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्‍पाचाही समावेश झाला आहे. याबाबत शासनाकडे सादर झालेल्‍या प्रस्‍तावास महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्‍या तांत्रिक मान्‍यतेनंतर राज्‍यस्‍तरीय तांत्रिक समितीच्‍या झालेल्‍या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यानंतर आता या प्रकल्‍पास राज्‍यातील महायुती सरकारनेही सुमारे 178.60 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्‍यता दिली आहे.

lahu kande radhkrishna vikhe patil eknath shinde
Loksabha Election 2024 : श्रीराम शेटे यांनी 'तुतारी' फुंकल्याने दिंडोरीत 'इंडिया' आघाडी झाली भक्कम!

सदर योजना 18 महिन्‍यात पूर्ण होणार असल्‍याची माहिती पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil )यांनी दिली. एकाच योजनेची माहिती दोघांनी दिल्याने नगररचना सहायक संचालक कार्यालयासाठी पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला. त्याचे श्रेय घेण्यासाठी जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली. आता पाणीपुरवठा योजनेसाठी पुन्हा श्रेयवादाची लढाई श्रीरामपूरकरांना पहायला मिळणार आहे.

lahu kande radhkrishna vikhe patil eknath shinde
Loksabha Election 2024 : लाल वादळाची लोकसभेत दिशा कोणती? 'माकप' पुन्हा नव्या जोमाने मैदानात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com