Governer Koshyari; उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर... वेळेत का झाले नाही?

नाराज झालेले खासदार उदयनराजे म्हणाले, खंत वाटते की, आता उशीर झाला आहे.
MP Udayanraje
MP UdayanrajeSarkarnama

नाशिक : (Nashik) छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी बोलता, तुमची लायकी काय आहे?. एक भगतसिंह होते ज्यांनी देशासाठी बलीदान केले, आणि हे काय बरळत सुटलेत, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांच्या राजीनाम्याविषयी खासदार उदयनराजे (Udayanraje) यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. (Udayanraje upset on delay on Centre for Governers resignation)

MP Udayanraje
BJP News; भाजपचे टार्गेट ठरले... उद्धव ठाकरेंची शिवसेना!

राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी आज स्विकारला मात्र त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. हा विलंब अयोग्य आहे. वेळेत हे सर्व काही नाही झाले, अशी विचारणा करीत खासदार उदयनराजे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

MP Udayanraje
Shinde Government News : शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट ; 'नियमित कर्ज फेडणाऱ्या..'

खासदार उदयनराजे नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यपालांच्या विषयावर मी राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्यांशी आम्ही पत्रव्यवहार केला. त्यांना त्याचे गांभिर्य कळविले. मात्र खंत वाटते की, निर्णय घेण्यास उशीर झाला आहे. एक म्हण आहे की, वेळेत जर निर्णय घेतला, तर बरंच काही सावरता येतं. केंद्र शासनाने राज्यपालांचा राजीनामा स्विकारण्यास एव्हढा उशीर केला आहे, त्याची खुप खंत वाटते. हे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांत उल्लेख करतात.यांची लायकी काय आहे?.

ते म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. अशा व्यक्तींनी, मग कुणीही असो, त्यांनी जबाबदारीनेच वक्तव्य करायला हवे. कारण नसताना कुठलेही, काहीही विधान करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. विशेषतः महाराष्ट्रात तर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोणीच असे ऐकुण घेणार नाही.

खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य उभारले. त्यासाठी लढाया केल्याचे सांगितले. ते म्हणाले, जगात अनेक मोठे योद्धे होऊन गेलेत. मात्र त्यांनी आपले साम्राज्य वाढविण्यासाठी युद्ध केलीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी राज्य केले. त्यांनी देशाला आपले कुटुंब मानले. आता परिवार म्हणजे फक्त मी आणि मी एव्हढं व्यक्तीकेंद्रित झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com