Thackeray Vs Shinde : एकनाथ शिंदेंचा राजकीय वध करणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार

Shivsena Political News : तुम्हाला जी दिल्ली दिसली ती शिवसैनिकांच्या कष्टामुळेच
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : 'प्रभू श्रीरामांनी जसा वालीचा वध केला तसाच आजच्या वालीचा वध आपल्याला करायचा आहे. कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली. आपल्या भगव्याची प्रतारणा केली,' अशा शेलक्या शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. ठाकरेंनी डिवचल्यानंतर आता शिंदें काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

नाशिक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचा कडक शब्दात समचार घेतला. ठाकरे म्हणाले, 'रामाने वालीचा वध केला, आताही आपल्याला आजच्या वालीचा वध करावा लागणार आहे, कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याची प्रतारणा केली, आपली शिवसेना पळवली त्या वालीची आणि त्यांचा जो कुणी वाली असेल, त्या सर्वांचा राजकीय वध करणार आहे,' हा निर्धारच ठाकरेंनी केला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : 'राम की बात हो गई, अब काम की बात करो' : उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज

ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजप आणि शिवसेनाचा (शिंदे गट) सडेतोड उत्तर दिले आहे. ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'शिवसेना माझी वडिलोपार्जीत संपत्ती आहेत. हे शिवसैनिक माझी संपत्ती आहेत. हा पक्ष आणि शिवसैनिक मला वारसाहक्काने मिळाला आहे. ते चोरून मिळालेले नाहीत. मग ही घराणेशाही का असेना,' असे स्पष्टपणे ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या रामभक्तीवरही ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले. 'तुम्हाला राम मंदिरापर्यंत पोहोचवले, त्या शिवसेनेला बाजूला करून त्याचे सर्व श्रेय घेतले. श्रेय घ्यायचे तर घ्या, पण तुमच्यात एकतरी रामाचा गुण आहे, हे दिसू द्या. राम हे सत्यवचनी होते, एकवचनीही होते. मात्र तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवले त्या शिवसेनेला दिलेले वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हीही प्रचार केला. तुम्हाला जी दिल्ली दिसली ती शिवसैनिकांच्या कष्टामुळेच,' असेही ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Jagan Mohan Vs Sharmila : 'वायएस' नव्हे 'मोरुसुपल्ली' शर्मिला! जगनमोहन यांनी दाखवला ‘सासर’चा रस्ता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com