Uddhav Thackeray : 'राम की बात हो गई, अब काम की बात करो' : उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज

Narendra Modi And Ram Temple : शिवसेनेला दिलेले वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता?
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : भाजपला शिवसेनेच्या कष्टामुळे दिल्ली दिसली, आता त्यांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आहे. वचन मोडणारे आज रामाचे भक्त म्हणवून घेतात. राम हे कुणा एकाची संपत्ती नाही. रामाच्या मुखवट्यात आज रावण फिरत आहेत. राम की बात हो गई, आता कामाच्या गोष्टी करू, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान केले. नाशिकमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचा समाचार घेतला.

'महाराष्ट्रावर जे जे चालून आले त्यांना मूठमाती दिली आहे. शिवाजीमहाराज जन्माला आले नसते तर राम मंदिर उभे राहिले नसते. प्रभू श्रीरामचंद्र हे कुठल्याही एका व्यक्तीची, एका पक्षाची मालमत्ता नाही. असे असेल तर आम्हाला आता भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल. रामाच्या रुपात फिरणाऱ्या रावणांचे मुखवटे फाडायचे आहेत,' असे म्हणत ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपला इशारा दिला आहे.

Uddhav Thackeray
Ayodhya Ram Temple : राम मंदिरासाठी जीवाचे रान केले; आता मात्र दुर्लक्षित, कोण आहेत 'ते' नेते ?

भाजपच्या (BJP) रामभक्तीवर प्रश्न उपस्थित करताना ठाकरे म्हणाले, 'ज्यांनी तुम्हाला राम मंदिरापर्यंत पोहोचवले, त्या शिवसेनेला तुम्ही बाजूला करून त्याचे सर्व श्रेय घेतले. श्रेय घ्यायचे तर घ्या, पण तुमच्यात एकतरी रामाचा गुण आहे, हे दिसू द्या ! राम हे सत्यवचनी होते, एकवचनीही होते. मात्र तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवले त्या शिवसेनेला दिलेले वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता,' असा थेट सवालही त्यांनी भाजपला विचारला आहे.

'आता देश राममय झाला. पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत. कालचा इव्हेंट झाला. राम की बात हो गयी, आता काम की बात करा. आता तुम्ही १० वर्षांत काय केले, ते सांगा. आता सांगता देशाला समर्थ करायचे आहे, मग दहा वर्षे अंडी उबवत होता का ? पहिल्या पाच वर्षांत पंतप्रधान जगभर फिरले, पण अयोध्येला गेले नाहीत. आता फक्त राम राम राम करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत? फक्त भारावून टाकले जात आहे. हे तुमचे रामराज्य का?' अशी अनेक प्रश्नांची भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) ठाकरेंनी सरबत्ती केली.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Uddhav Thackeray
Congress News : कोल्हापूर की हातकणंगले? आजच्या बैठकीत ठरणार काँग्रेसची रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com