Uddhav Thackeray : मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी दिला नवा नारा; आता जिंकेपर्यंत...

Uddhav Thackeray Malegaon Speech : ''ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे''
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत ठाकरे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच सभेच्या माध्यमातून ठाकरेंनी 'आता जिंकेपर्यंत लढायचं..' असा नवीन नारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सभेतून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला. तुम्ही आईच्या कुशीवर वार केला. हिंमत असेल तर आज निवडणूक घ्या. तुम्ही मोदींच्या नावाने लढा, मी बाळासाहेबांच्या नावाने लढतो'', असा इशारा ठाकरे यांनी शिंदेंना आणि भाजपला दिला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं

''तुम्ही जे प्रेम आम्हाला देत आहात, ते गद्दारांना मिळत नाही. हे प्रेम विकत आणता येत नाही. लोकं सत्तेकडे जातात. पण अद्वैत हिरे हे भाजप सोडून आज शिवसेनेकडे आले आहेत. भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील दुवा आपल्यासाठी महत्वाचा आहे'', असं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Malegaon Sabha : खंडोजी खोपड्यांची अवलाद म्हणत उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल

''गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही. पक्ष चोरला, चिन्ह चोरले पण यांना शिवसैनिक चोरता येणार नाही. मात्र, गद्दारीचा शिक्का कपाळावर मारुन घेतला, असं ठाकरे म्हणाले. ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे 'आता जिंकेपर्यंत लढायचं...,' असा नवीन नारा उद्धव ठाकरे यांनी या सभेतून दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com