Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची आमदारकी 13 मे रोजी संपणार; पुढे काय? संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut On Uddhav Thackeray MLA term : उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. ते पुन्हा आमदार होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
Sanjay Raut | Uddhav Thackeray
Sanjay Raut | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढे काय होणार? उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाचे फायर ब्रॅण्ड नेते व खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या जागेवरून मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थीतीत राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राऊत म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे. कारण आमचे २० आमदार आहेत. असे असतानाही आम्ही राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) दिली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. कारण आम्हाला एकत्र काम करायचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याबाबत त्यांची इच्छा काय असा सवाल पत्रकारांनी केला असता राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंची इच्छा ते स्वत: सांगतील. पण आम्हाला सर्वांना असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी या राज्याचे नेतृत्व करायला हवे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचं उत्तम प्रकारे नेतृत्व केलेलं आहे. अगदी संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि आमच्या आमदारांना बळ मिळेल असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut | Uddhav Thackeray
Nashik Crime : गोळीबार प्रकरणात तिकडे आरपीआय नेते लोंढे टोळीसह जेलमध्ये, मग पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कुणी केला?

दरम्यान यासंदर्भात मविआतील जे पक्ष आहेत, प्रमुख पक्ष किंवा इतर यांच्याशी सोबत बसून चर्चा करावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान राऊत यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी राजकीय वक्तव्ये करण्यापेक्षा आम्ही एकत्रित निर्णय घेऊ तो तुम्हाला दिसेल, असे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut | Uddhav Thackeray
sabapati election : सभापती-उपसभापती निवडीआधीच राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेचे वर्चस्व; शिंदेंच्या आदेशानुसार नावं अन् कार्यकाळ जाहीर

त्यामुळे मविआमधील राज्य सभेच्या जागेचा तिढा सुटला असला तरी आता महाविकास आघाडीपुढे विधान परिषदेच्या जागेचा नवीन तिढा निर्माण झाला आहे. तो कशाप्रकारे सोडवला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com