Buldhana Accident News : समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खासगी बसच्या झालेल्या अपघातात मृत प्रवाशांची संख्या २६ झाली आहे. याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Uddhav Thackeray pay homage to deceased passengers in Buldana accident)
बुलढाणा येथील खासगी बस अपघातात (Accident) २६ प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. त्याबाबत शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अपघाताविषयी संवेदना व्यक्त केल्या.
या अपघाताविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांनी ट्वीट करून अपघातातील मृत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणतात, `बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत.
बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवाना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
दरम्यान या अपघाताबाबत ट्विटरवर विविध तज्ञांनी देखील मत मांडले आहे. `आपण सर्व नेहमी चालक आणि वाहनावर बोलतो. पण, ज्या यंत्रणा/विभाग या ट्रॅव्हल्स कंपन्यांना अंधाधुंद मोकळीक देते त्याचे काय?. याबाबत सगळच सगळ्यांना माहिती असते, पण बोलत कोणीही नाही`, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, परिवहन मंत्री असलेले मुख्यमंत्रीच या विभागाबद्दल बेफिकीर आहेत, अशी नाराजी व्यक्त होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन फक्त नावालाच आहे, आपले स्वतःचे अनुभव आहेत. बिना दलाल काहीच होत नाही, पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या गाड्या पहा, त्यांची अवस्था अतिशय खराब असते. प्रादेशिक परिवहन विभाग त्याबाबत गप्प असतो. अनेक पदे रिक्त आहेत, हा विभाग काम करणार तरी कसा?.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.