Jalgaon: भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष फोडो ही नीती वापरली आहे.. त्यांनी पक्ष फोडून लोक आपल्याकडे घेतले आहे. त्या भाजपात मूळ राहिले कोण? अगदी एकनाथ खडसे यांचाही त्यांनी छळ करून त्यांना पक्षाबाहेर काढले, आज सगळे उपरे राहिले आहेत. आता ते महाराष्ट्रात आयाराम लोकांचे संपर्क मंदिर बांधताहेत असा हल्लाबोल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपावर केला. याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा संपवली आहे असा खळबळजनक दावाही केला.
जळगाव येथील मानराज पार्कजवळील मैदानात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर जयश्री महाजन,जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते. या सभेत ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.
उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष फोडो नीती वापरली आहे, त्यांनी विरोधी पक्षातील अनेक जण आपल्याकडे घेतले आहे, मुळ भाजपत कोणीही राहिलेले नाहूी, त्याठिकाणी सगळे उपरेच आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतीय जनता पक्ष संपवून टाकला आहे. यावेळी जनतेतून ‘टरबूज’ असा आवाज आल्यावर ‘असा व्यक्ती कोणी आहे का’?असे मतही व्यक्त केले.
उध्दव ठाकरे म्हणाले, सर्व विरोधी पक्षाची एकजूट झाल्यानंतर ‘इंडिया’आघाडीला केंद्रातील सरकार एवढे घाबरले आहे. ते हालायला लागले आहे, त्यांना आता ‘इंडिया’नावाचीही खाज सुटायला लागली आहे. ते आता बदलून ‘भारत’म्हणायला लागले आहेत. परंतु, आम्ही इंडिया, भारत आणि हिंदुस्थानही म्हणणार आहोत.
विरोधक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही असे फलक लावत आहे. होय, मी शिवसेनेची कॉंगेस होऊच देणार नाही, २५ वर्षे सोबत राहून शिवसेनेची भाजपही झालेली नाही. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही, आम्ही भाजप(BJP)चे गुलाम होणार नाही.जर त्यांनी आम्हाला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही मोडून तोडून टाकणार आहोत असा निर्धारही त्यांनी व्यक्त केले.
मोदींना जनता हटवणारच...
शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात नाही, उज्वला गॅस अंतर्गत महिलांना गॅस दिला जात नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही सर्व काही नाही,नाही म्हणणाऱ्या या केंद्रांतील मोदी सरकारला येत्या २०२४ च्या निवडणूकीत जनता सत्तेवर ठेवणार नाही. त्यांना हटवणार म्हणजे हटवणारच असा इशारा ठाकरे यांनी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.