Banana farmers’ protest in Jalgaon turns aggressive; protesters storm Collector’s office gate.
Banana farmers’ protest in Jalgaon turns aggressive; protesters storm Collector’s office gate.Sarkarnama

Jalgaon Politics : जळगावला शेतकरी मोर्चात जोरदार राडा; आंदोलक गेट तोडून कलेक्टर ऑफिसमध्ये शिरले

Jalgaon Politics : जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला आक्रमक वळण लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट फोडले. उन्मेष पाटील, बच्चू कडू, काँग्रेस-राष्ट्रवादी नेते सहभागी झाले.
Published on

Jalgaon News : केळी उत्पादकांच्या प्रश्नावर जळगावला गुरुवारी (18 सप्टेंबर) निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चाला अचानक आक्रमक वळण मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चास्थळी येण्यासाठी नकार दिल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. मोर्चात राडा करीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस देखील सहभागी झाली होती. या मोर्चाला केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन तातडीने पाळावे. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे, अशा मोर्चातील प्रमुख मागण्या होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आल्यानंतर पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवेदन घेण्यास मोर्चास्थळी यावे अशी मागणी केली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम नकार दिला.

Banana farmers’ protest in Jalgaon turns aggressive; protesters storm Collector’s office gate.
Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेच्या प्रभागरचनेवर हरकतींचा पाऊस, चार दिवस चालणार सुनावणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या नकारामुळे शेतकरी संतप्त होत घोषणा देऊ लागले. आक्रमक झालेल्या पाटील आणि बच्चू कडू यांनीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रवेशद्वारावर यावे असा हट्ट धरला. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी गेट बंद केल्याने शेतकऱ्यांनी गेटला धक्के देत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. जय जवान जय किसान यासह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आभार दुमदुमले.

Banana farmers’ protest in Jalgaon turns aggressive; protesters storm Collector’s office gate.
Jalgaon News : पोलिसांनी टाळाटाळ केली, प्रांताधिकाऱ्यांनी दाखवली ताकद ; एका आदेशाने अपहृत मुलाची सुटका

पोलिसांनी अडकाठी आणूनही नेते आणि शेतकरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात अक्षरशः घुसले. त्यानंतर निवेदन देऊन ते बाहेर पडले. यानंतर बोलताना पाटील म्हणाले, जळगावमध्ये सर्व 11 आमदार, दोन खासदार आणि 3 मंत्री सत्ताधारी पक्षाचे आहेत. केळी उत्पादक संकटात असताना यातील कोणीही मदतीला आला नाही. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकू नये असे सत्ताधाऱ्यांना वाटते. त्याचा आम्ही निषेध करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com