Nashik Politics : नाशिक मतदारसंघाच्या मतदार यादीत घोळ; ठाकरे गटाचा संताप

Nashik Lok Sabha Constituency Election Uddhav Thackeray Shiv Sena Workers Protest : मतदार यादीत मोठा घोळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, तहसीलदारांकडे तक्रार केली आहे...
Nashik News
Nashik News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Lok Sabha Constituency News :

लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू आहे. यामध्ये अनेक गोंधळ उघडकीस येत आहेत. राहुरी (नाशिक) या गावात घडलेल्या प्रकाराने तर सबंध गावच संतप्त झाले.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. मतदान यंत्राबाबत तक्रारी असतानाच आता मतदार यादीतही गोंधळ आढळला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या Uddhav Thackeray गटाने याबाबत तक्रार केली. प्रशासनाने सर्व याद्यांची फेर तपासणी करावी, अशी मागणी मतदारसंघ संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी केली आहे.

मतदार यादीमधील गोंधळ नवा नाही. अनेकदा निवडणुकीत मतदान केंद्रावर गेल्यावर मतदारांचा गोंधळ आणि धावपळ होत असल्याचे निदर्शनास येते. मतदारांची नावेच गायब होणे यात नावीन्य राहिलेले नाही. मात्र, याची झळ थेट गावगाडा हाकणाऱ्या प्रमुखांनाच बसत असेल, तर काय? असा गंभीर प्रश्न राहुरी (ता. नाशिक) येथे निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणूक यंत्रणेचा निषेध केला.

Nashik News
Loksabha Election 2024 : भाजपच्या निरीक्षकांची चिडचिड अन् कार्यालयात पोहोचण्यास विलंब! नक्की काय घडलं?

लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून त्यावर लक्ष ठेवले जाते. मात्र, अनेक कर्मचारी आणि यंत्रणा या प्रत्यक्ष गावात न जाताच परस्पर याद्यांमध्ये दुरुस्त्या आणि बदल करत असल्याचे दिसून आले आहे. राहुरी या गावात थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची नावे शेजारच्या दोनवाडे गाव आणि भगूर नगरपालिकेच्या मतदार यादीत वर्ग करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.

दोन दिवसांपूर्वी मतदार याद्या प्रकाशित झाल्या. गावातील काही तरुण राजकीय कार्यकर्त्यांनी या याद्या मिळविल्या. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावातील प्रभाग क्रमांक एक ते तीन यातील 270 नावे लगतच्या गावांमध्ये समाविष्ट करण्यात आली. अन्य गावांतील पन्नासहून अधिक मतदारांची नावे या गावात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे सबंध ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयापुढे जमून शासनाचा निषेध केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खुद्द सरपंच संगीता संपत घुगे तसेच ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर यांच्याकडे तक्रार केली. करंजकर यांचे शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले.

याबाबत सरपंच संगीता घुगे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. हे सर्व ग्रामस्थ कार्यकर्त्यांसह तहसीलदार कार्यालयात गेले असता, मतदार यादीचे काम करणारे कर्मचारी न भेटल्याने त्यांनी तहसीलदार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त ग्रामस्थांच्या गोंधळामुळे कार्यालयातही धावपळ उडाली. संबंधित कर्मचारी गावात न येताच तहसीलदार कार्यालयात बसून मतदार याद्यांचे काम करत होते. त्यामुळे मतदारसंघातील अनेक याद्यांमध्ये असा गोंधळ झाल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात तक्रारी आल्याने तहसीलदारही सावध झाले आहेत. त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मतदार याद्या सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

R

Nashik News
Nashik Politics : नाशिककरांना दिलासा?; भाजपच्या 3 आमदारांना जमलं नाही, ते शिंदे गटानं करून दाखवलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com