Uddhav Thackeray News : भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, हीच का मोदी गॅरंटी? ठाकरेंनी डागली तोफ

Uddhav Thackeray on Modi Guarantee : उद्धव ठाकरे यांचा संवाद सभेतून भाजप, पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल...
Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Ahmednagar News :

भाजपची नालायक कारकीर्द पाहिल्यावर शिवसेनेने भाजपला दिलेली 25 वर्षे वाया गेली. शिवसेनेची ही मौल्यवान वर्षे सडली. 'भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, हीच का मोदी गॅरंटी', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरमधील संवाद सभेतून मोदींच्या गॅरंटीचा समाचार घेतला.

Uddhav Thackeray हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. सोनई (ता. नेवासा) येथील त्यांची पहिली संवाद सभा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नेते खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, नगर दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगर उत्तरप्रमुख रावसाहेब खेवरे, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, संदेश कार्ले, भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Shirdi Tour : बाळासाहेब थोरातांच्या लॉबिंगनंतरही ‘शिर्डी’साठी उद्धव ठाकरेंचा गोळाबेरीज दौरा...

"ही नालायक कारकीर्द बघितल्यानंतर 20-25 वर्षे भाजपला साथ दिली. ती शिवसेनेची मौल्यवान वर्षे सडली. हिंदुत्वाचा नारा दिला, पण यांचे वेगळेच हिंदुत्व होते. हे आता मला कळलं. अनेक ठिकाणी मुस्लिम समाज जोडला जात आहे. तुमचे हिंदुत्व आणि भाजपमधील हिंदुत्व फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे, तर भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे. भाजपचा हा कारभार संपूर्ण जग, देश आणि महाराष्ट्र बघत आहे. हीच मोदी गॅरंटी आहे का? भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या. तुम्हाला मंत्रिपद मिळेल. मुख्यमंत्रिपद मिळेल, उपमुख्यमंत्रिपद मिळेल. 'यह मोदी गॅरंटी है, भ्रष्टाचार करो और भाजपमध्ये आ जाओ', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या एका व्हिडिओची आठवण करून दिली.

आम्ही सर्वांसाठी दारे उघडलेली नाहीत. आम्ही फिल्डर लावला आहे, याचा किस्सा उद्धव ठाकरे यांनी या संवाद सभेत सांगितला. तू कितीचा भ्रष्टाचार केलाय. शंभर कोटींचा, नको. दहा हजार कोटी, तू ये. 70 हजार कोटी, तू तर येच. तुम्ही उपमुख्यमंत्री. त्याच्यावरून मोठा केला आहे, तर मुख्यमंत्री करतो. हा फिल्डर तुमचा? जगामध्ये आपल्या देशाची आणि आपल्या हिंदुत्वाची निंदानालस्ती होत आहे. हे बघवत नाही. राम मंदिर बांधल्याचे हिंदुत्ववाद, भ्रष्टाचाराला साथ देणारे आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मोठ मोठे नेते झुकले तरी महाराष्ट्र झुकणार नाही. हे महाराष्ट्र दाखवून देणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी या वेळी दिला.

'संघ, भाजप निष्ठावंतांनी आता उपऱ्यांची कामे करायची'

"महाराष्ट्राची लूट करणारे हे हुकूमशाह परवडणार नाही. ही हुकूमशाही बरबाद करायला निघाली आहे. शेतकरी हमीभाव मागतो आहे. शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, पण गद्दारांच्या मागण्या पूर्ण होत आहेत. राज्यसभा पण मिळेल. भ्रष्ट कारकीर्ददेखील धुतली जाईल. अशोक चव्हाण तिकडे गेले. ते राज्यसभेचा अर्जदेखील भरतील, असे सांगून कट्टर भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांचा आदर आहे का?", असा सवाल त्यांनी केला.

हे निष्ठावंत बाजूला ठेवून त्यांच्यावर आता हे उपरे बसवले आहेत. हेच तुमचे हिंदुत्व आहे. हे हिंदुत्व 'आरएसएस' आणि भाजपच्या निष्ठावंतांना मान्य आहे का? 'आरएसएस'साठी काम करणारी व्यक्ती कौटुंबिक सोहळ्याला हजर राहिली नाही, पण 'आरएसएस'च्या बैठकीला हजर राहायचे. आता उपरे तुमच्या डोक्यावर बसवले जात आहेत आणि तरी तुम्ही त्यांचे काम करत राहणार आहात. हे शिवसेना मान्य नाही करणार. शिवसेना मोदींजीची पालखी वाहण्यासाठी नाही. आम्ही शिवभक्त आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहू. नतद्रष्ट भाजपची पालखी अजिबात वाहणार नाही, असे त्यांनी सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'शेतकरी चीन, पाकिस्तानमध्ये घुसत नाही...'

उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान म्हणतात, मेरे भाई और बेहनो. मेरे प्यारे देशवासियो. सबका साथ. निवडून आल्यानंतर मित्राचा विकास. निवडून आल्यानंतर त्यांना शेतकरी दिसत नाही. शेतकरी फक्त निवडून देण्यापुरता लागतो. शेतकऱ्यांमुळे पंतप्रधान दिल्लीत आहेत, पण शेतकरी दिल्लीत नको. याच शेतकऱ्यांना दिल्लीच्या वेशीवर अडवले जात आहे. चीन, पाकिस्तानमध्ये घुसत नाही. स्वतः हक्काच्या राजधानीत मंत्र्यांना भेटयला जात आहेत. अश्रुधुरांचा मारा होत आहे. शेतकरी अगोदर रडतोय. हमीभाव मागत आहे. तो भीक मागत नाही. मागाल तर गोळ्या घालू अशी स्थिती आहे".

शेतकऱ्यांचा छळ करण्याची नाटके संपू्र्ण महाराष्ट्र बघत आहे. मोदीजींना वाटत असेल, की मोठमोठे नेते आपण फोडून घेतले, तर पाळीव जनावरांसाठी यांची जनतादेखील त्यांच्या पाठीकडे जाईल. तसे नाही मोदीजी, हा महाराष्ट्र आहे. संकटाच्या छाताडावर चालून जाणारा महाराष्ट्र आहे. पंतप्रधान म्हणून तुम्ही जे करत आहात, तो शोभत नाही. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की, गुजरात आहात? तुम्ही महाराष्ट्राला देत तर काहीच नाही. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये घेऊन जात आहे. गुजरातबद्दल असूया नाहीत. गुजरातचा समाज दुधात साखर, जशी मिसळली जाते, तसा महाराष्ट्रात विसावला आहे, मग महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जाणार असतील, तर आपण काय त्यांचे घोडे मारले आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

edited by sachin fulpagare

R

Narendra Modi, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : शिर्डी दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का! मोठ्या नेत्याचा राजीनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com