Uddhav Thackeray Shirdi Tour : बाळासाहेब थोरातांच्या लॉबिंगनंतरही ‘शिर्डी’साठी उद्धव ठाकरेंचा गोळाबेरीज दौरा...

Shivsena News : शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा निर्णायक आणि महत्त्वाचा ठरणार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagar politics : राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असून, यात ते जनसंवाद सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षासाठी खूप काही गणित जुळवणार, तर विरोधकांची गणिते बिघडवणारा आहे. काॅंग्रेसकडून शिर्डीवर प्रबळ दावा होत असताना उद्धव ठाकरे यांचा हा दौरा शिर्डीसाठी गोळाबेरीज यशस्वी करणार ठरणार का?, हे कळणार आहे. (Uddhav Thackeray's strong campaign for Shirdi Lok Sabha constituency)

लोकसभा २०२४ ची निवडणूक सर्वच राजकीय पातळीवर वेगळी ठरत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या फुटीमुळे ही लोकसभा निवडणूक वेगळ्याच दिशेने गेली आहे. भाजप महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी-इंडिया, असा सामना असला, तरी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष एक-एक फुटत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीला वेळच मिळत नसल्याचे दिसते, हे उद्धव ठाकरे यांनी हेरले असून, शिवसेना एकसंघ असताना त्या जागा शिवसेनेकडे होत्या, त्या जागांवर काम सुरू केले आहे. यातूनच ते मराठवाड्यासह शिर्डी दौऱ्यावर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे हे शिर्डीत दोन दिवस तळ ठोकून राहणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा २००९ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना फुटीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे गेले. त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. उद्धव ठाकरे हे शिर्डीतील नेवासा, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि अकोले या विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे यांच्या श्रीरामपूर आणि राहुरी येथे जनसंवाद सभा होणार आहेत.

Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : जयंतरावांच्या चिरंजीवाची हातकणंगलेमधील लोकसभेची ‘हवा’ जिरली

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शिर्डीवर दावा कायम ठेवला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव राहिला आहे. शिर्डी मतदारसंघावर २००९ पासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा २००९ मध्ये शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव गेला होता. हा पराभव रामदास आठवले यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि ते काॅंग्रेसमध्ये गेले.

उमेदवार पळवला गेल्याने शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी ऐनवेळी साथ सोडल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. मुंबईहून ऐनवेळी सदाशिव लोखंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने आयात केलेल्या उमेदवारासाठी शिवसैनिकांनी आदेश मानून मोर्चेबांधणी केली. मतदारांनीही शिवसेनेला साथ दिली. भाऊसाहेबांनी ऐनवेळी साथ सोडल्याने मतदारांना हे आवडले नाही आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. भाऊसाहेबांचा दारुण पराभव झाला.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Group NCP : शरद पवार गटाचा कवितेतून भाजपला टोला; म्हणाले, 'शेंबडं पोर...'

सदाशिव लोखंडे त्यावेळी अवघ्या १७ दिवसांच्या प्रचाराच्या जोरावर शिर्डीचे खासदार झाले. मात्र, खासदार लोखंडे हे मतदारसंघात फिरत नाहीत. लोकांबरोबर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संपर्कात नाहीत, असे वातावरण तयार झाले. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नको, असे वातावरण निर्माण झाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही तशी भूमिका घेतली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी युतीत पुन्हा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करत सदाशिव लोखंडे यांना २०१९ मध्ये खासदार केले.

शिवसेना फुटीत खासदार लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजप सत्तेत सहभागी होत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. खासदार लोखंडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असली, तरी शिर्डीतील बहुतांशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजही ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिर्डीतून शिवसेना उद्धव ठाकरे यांचाच खासदार करायचा, असा चंग या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बांधला आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदारकीसाठी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. भाऊसाहेबांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. भाऊसाहेबांनी ऐनवेळी साथ सोडल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता; परंतु ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत घालून तयारी लागा, अशा सूचना केल्या.

Uddhav Thackeray
Hiraman Khoskar will Resign? : ‘त्या’ इतिहासामुळे खोसकर काँग्रेस सोडताना दहा वेळा विचार करतील!

उद्धव ठाकरेंची यांची ताकद मिळताच, शिवसैनिक पुन्हा जोमाने कामाला लागे आहेत. यातच जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस शिर्डी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंचा हा दौरा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अधिक दिशा देणारा, असा असणार आहे. शिर्डीसाठी ठाकरे गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत. ठाकरे शिर्डीत नेमक्या कोणाच्या उमेदवाराची घोषणा करतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी ठाकरेंचा हा दौरा निर्णायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे.

Uddhav Thackeray
Ashok Chavan Resignation : चव्हाणांच्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यानं सगळंच काढलं, भाजपवरही केला हल्लाबोल

शिर्डीसाठी काॅंग्रेसची आग्रही मागणी

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष काॅंग्रेसकडून आग्रही मागणी होत आहे. काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या जागेसाठी महाविकास आघाडीवर दबाव आणला आहे. यातच शिर्डीत उद्धव ठाकरे यांचा दौरा होत आहे. त्यामुळे काॅंग्रेसचा हा दबाव दूर करण्यासाठी ठाकरे यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.

उत्कर्षा रूपवते यांची मोर्चेबांधणी

काॅंग्रेसच्या निष्ठावान आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उत्कर्षा रूपवते यांनी शिर्डी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. महिला मेळावे घेण्याबरोबर इतर कार्यक्रमांना त्या हजेरी लावत आहेत. शिर्डीची जागा काॅंग्रेससाठी अनुकूल असल्याचे त्यातून सांगितले जात आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी हाच धागा पकडला आहे. यातून काॅंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात शिर्डीच्या जागेबाबत रस्सीखेच सुरू आहे. ही जागा नेमकी कोणाकडे राहणार, हे उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेनंतर कळेल.

R

Uddhav Thackeray
Satara News: एका चिठ्ठीनं राखली सत्ता; शरद पवार गटाचा शिंदे गटाला धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com