Bjp News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर नगर, नाशिक जिल्ह्यातील 'या' मतदारसंघाची जबाबदारी

Political News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवली आहे.
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवली आहे.

मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवली आहे. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याकडे नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभांची जबाबदारी दिली आहे. (Bjp News )

लोकसभा निवडणुकीत जालन्यामधून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील, बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे यासारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (Bjp) ज्येष्ठ नेत्यांकडे मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यास सुरुवात केली आहे.

भाजपकडून नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभांची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. जे आम्ही लोकसभेला अनुभवले आहे, त्याप्रमाणे काही होऊ नये याची दक्षता आमच्याकडून घेतली जात असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फार प्रमाणात मतभेद असतात. घरात चार लोक राहतात मतभेद होतात, हा तर मोठा पक्ष आहे मतभेद होतीलच. त्याबाबत चर्चा करून आम्हीवर विषय पोहोचविणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Raksha Khadse
Mahayuti News : महायुतीच्या बैठकीत 173 जागांवर एकमत; जागावाटपाची 10 सप्टेंबरला होणार घोषणा; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्या जागा भाजपकडूनच लढवल्या जातील. महायुती म्हणूनच येणारी निवडणूक लढवली जाईल. प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. वरिष्ठांनी आदेश दिला आहे, महायुती म्हणून तीन पक्ष सोबत मिळून निवडणूक लढायची आहे. शिंदे गटाचे अजितदादा गटाचे कार्यकर्ते सोबत आहेत. सर्व मिळून निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले.

थोड्याफार अडचणी सगळीकडे असतात. आमदारांवर लोकप्रतिनिधींवर नाराज आहेत, असे काही नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत असतो. छोट्या मोठ्या विषयांवर चर्चा झाली. सूचना देण्याचे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. उमेदवारी मागणी गुन्हा नाही पक्ष ठरवते कोणाला उमेदवारी द्यायचे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचे असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रक्षा खडसे यांनी सांगितले.

Raksha Khadse
Ratnagiri Assembly Election: रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेसाठी कोकणी माणसाची साथ शिंदेंना की ठाकरेंना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com