

Jalgaon Politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत असून कोरेगाव पार्क येथील बाजारभाव १८०० कोटींची असलेली जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.
यावरुन विरोधकांनी अजित पवारांना टार्गेट करण्यास सुरुवात केली असताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला असून खळबळजनक आरोप केले आहेत.
उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भूखंडाचा मोठा आरोप केला आहे. तर आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही गौण खनिज चोरीचा आरोप केला आहे. उन्मेष पाटील म्हणाले की, भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला प्रकार तर फक्त एक नमुना म्हणजेच सॅम्पल आहे. यामागचे खरे विद्यापीठ म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था (बीएचआर) आणि इतर माध्यमातून भूखंड लूट करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन आहे, असा गंभीर आरोप उन्मेष पाटील यांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करावी, असे आवाहनही केले आहे.
त्याचप्रमाणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही उन्मेष पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. चाळीसगावातील एमआयडीसी परिसरात शेकडो कोटींच्या गौण खनिज चोरीचा आरोप त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या गटावर केला. मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावची लूट चालू आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही लूट यात्रा काढणार आहोत अशी माहिती उन्मेष पाटील यांनी दिली.
अकरावी-बारावी नापास असलेला माणूस हजारो कोटींचा मालक कसा झाला? हा पैसा मेहनतीने कमावला की जनतेला लुटून? असा सवाल आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला.
मंगेश चव्हाण हा पाठीत खंजीर खुपसणारा नेता आहे. मी व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार ही त्याची पहिली दोन उदाहरणे आहेत. तसेच आता पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्याबाबतीतही त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचे उन्मेष पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.