भाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड

त्या विरोधात पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील केले होते.
Eknath khadse
Eknath khadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांची जळगाव जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाला हा धक्का मानला जात आहे. (Unopposed election of Eknath Khadse on Jalgaon District Bank)

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. भुसावळ येथील एका पतसंस्थेचे कर्ज थकीत असल्याने नाना पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला होता, त्या विरोधात पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील केले होते. ते अपील फेटाळून लावण्यात आले आहे.

Eknath khadse
बॉम्ब फोडण्याच्या फडणवीसांच्या इशाऱ्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री टेन्शनमध्ये

एकनाथ खडसे यांच्यासोबत इतर गटातील आठ उमेदवारांचे अर्जही फेटाळण्यात आले होते. त्याविरुध्द पाटील व इतर आठ उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (ता. ५ नोव्हेंबर) सुनावणी होऊन सर्वांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. यामुळे मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून खडसे यांच्या विरोधात असलेला एकमेव अर्ज फेटाळला असल्याने खडसे यांची जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे.

Eknath khadse
ही फक्त सुरुवात आहे...आर्यन खान प्रकरणाचा तपास वानखेडेंकडून काढल्यानंतर मलिकांचे सूचक ट्विट

दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच खडसे यांच्या बिनविरोध निवडीला आव्हान देणारा अर्ज न्यायालयाने फेटाळूल लावण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com