Birdev Done And Aditi Chougule : 'UPSC'त कोल्हापुरचाही डंका! मेंढपाळाच्या पोराचं लख्ख, तर सैन्य दलातील 'आदिती'चं सॅल्यूट करणार यश

upsc success story : युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज (22 एप्रिल) जाहीर झाला असून महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशभरातून तिसरा आला असून शक्ती दुबेने देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. पण यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचाही डंका देशभर वाजला आहे.
Birdev Done And Aditi Chougule
Birdev Done And Aditi Chougulesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज (22 एप्रिल) जाहीर झाला. यावेळी शक्ती दुबेने देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला असून महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे. यामुळे मोठी चर्चा होत आहे. पण पुणेच नाही तर कोल्हापुरच्या दोघांनीही या कठीण परीक्षेत लख्ख यश संपादन केलं आहे. यामुळे पुणे, ठाणेपाठोपाठ कोल्हापुरचे ही नाव आता देशाच्या नकाशावर गेले आहे.

युपीएससीच्या परीक्षा 2024 मध्ये यंदा एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले असून यात 725 पुरुष आणि 284 महिला आहेत. तर यावेळी पहिल्या पाच मध्ये तीन महिला आहेत. तर यामध्ये पुण्याच्या अर्चित डोंगरेचा समावेश असून तो तिसरा आला आहे. याचबरोबर ठाण्याची तेजस्वी देशपांडे ही 99 आणि अंकिता पाटील ही 303 व्या क्रमांकाने पास झाली आहे.

तर कोल्हापूरच्या दोघांनीही या परीक्षेत मोठं यश मिळवले असून यात कोल्हापुरातील यमगे येथील मेंढपाळा घरातील बिरदेव सिध्दाप्पा डोणे आणि जयसिंगपूर येथील आदिती संजय चौगुले यांचा समावेश आहे.

Birdev Done And Aditi Chougule
Kolhapur Politics : मेहुणे परत जायच्या तयारीत, दाजीचा शांत डोक्याने कार्यक्रम: नेमकं काय ठरलं?

आदिती चौगुलेने मिळवली 63 वी रँक

जयसिंगपूर चिप्री येथील आदिती संजय चौगुले हिने युपीएससीत 63 वी रँक मिळवली आहे. विशेष म्हणजे याआधीही तिने असे यश मिळवले असून 2023 मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेत तिने 433 वा क्रमांक मिळवला होता. सध्या ती इंडियन डिफेन्स अकौंट सर्व्हिसमध्ये आहे. पण आता तिला आयएएसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

आदितीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालू हायस्कूल जयसिंगपूर व उच्च माध्यमिक शिक्षण जनतारा ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर याठिकाणी झाले आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तिने घेतली आहे. युपीएससी परीक्षेची तयारी करताना पदवीत्युर पदवी घेवून नेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती दत्त साखर कारखान्याचे चीफ इंजिनिअर संजय चौगुले यांची कन्या आहे.

मेंढपाळाच्या मुलाची भरारी

यमगे येथील बिरदेव डोणे याचे वडील मेंढपाळ असून घरात कोणतीच सुविधा नसताना बिरदेव हे यश मिळवले आहे. बिरदेवने या परीक्षेत 551 वी रँक मिळवली असून आताही निकाल लागल्या त्यावेळी तो बेळगाव परिसरात बकरी चारण्यामध्ये व्यस्त होता.

शाळेचा व्हरांडावर अभ्यास

बिरदेवने लहान वयातच अधिकारी व्हायचं मनाला गाठं बांधली होती. त्यापद्धतीने त्याचा अभ्यास सुरू होता. पण दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने तो गावातील मराठी शाळेचा व्हरांड्यात अभ्यास करत होता. त्याने गावातच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून 10 वीत त्याला 96 टक्के गूण मिळाले असून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. त्यावेळी त्याचा सत्कारात करण्यात आला होता. तेंव्हा त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले होतं. आता त्याचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

Birdev Done And Aditi Chougule
Kolhapur Gokul Dudh Sangh Election : निवडणुकीला एक वर्ष, गोकुळसाठी आतापासून आप्पा महाडिक मैदानात

तिसऱ्या प्रयत्नात यश

आय.पी.एस होण्याचे स्वप्न बिरदेवला स्वस्थ बसू देत नव्हते. यामुळे तो आधी दोन वर्षे दिल्ली येथे त्यानंतर पुणे येथे आला तिथे सदाशिव पेठे येथे अभ्यास करून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. पण त्याला यश मिळाले नव्हते. पण आता 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत त्याने लख्ख यश मिळवले असून 551 वी रँक मिळवली आहे. तर कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी होण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com