Jalgaon Politics: भाऊ शिंदे गटात, बहीण ठाकरे गटात ; 'असे' झाले रक्षाबंधन !

Kishore Patil News : शिवसेना फुटल्यानंतर राजकीय फुट पडलीच परंतु काही ठिकाणी नात्यातही वाद निर्माण झाले आहेत.
Kishore Patil
Kishore Patil Sarkarnama

Jalgaon News : शिवसेना फुटल्यानंतर राजकीय फुट पडलीच परंतु काही ठिकाणी नात्यातही वाद निर्माण झाले आहेत. तसेच ते जळगावताील पाचोऱ्यातही झाले. आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात तर त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी ठाकरे गटात आहेत. बुधवारी ठाकरे गटातर्फे वैशाली सूर्यवंशी यांनी 'राखीला हात द्या, बहिणीला साथ द्या' हा कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमात त्यांचे बंधू शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी हजेरी लावून राखी बांधून घेतली. त्यामुळे या राजकीय रक्षाबंधनाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे (Shiv Sena) माजी आमदार (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी आपल्या पाचोरा मतदारसंघातील आमदारकिची जागा किशोर पाटील यांना दिली. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत गेले. त्यांनी ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी या आपल्या वडिलांचा वारसा कायम ठेवण्यसाठी राजकीय मैदानात उतरल्या आहेत.

Kishore Patil
Pankaja Munde Daura: दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय; कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला

त्यांनी किशोर पाटील यांच्याशी विरोध पत्करून थेट ठाकरे गटासोबत असल्याचे जाहीर केले. त्यावेळेपासून आमदार किशोर पाटील व वैशाली सूर्यवंशी या भाऊ-बहिणींमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. या वादातही मागील वर्षी रक्षाबंधनाच्या वेळी किशोर पाटील यांनी बहीण वैशाली सूर्यवंशी यांचे निवासस्थानी जाऊन राखी बांधून घेतली होती.

Kishore Patil
Pankja Munde-Jankar News : पंकजा मुंडेंनी ओवाळणीत मागितला `ब्लॅंक चेक`..

त्यानंतर याची मतदारसंघात चर्चा झाली होती. परंतु नाते संबंधात राजकारण नसावे असे किशोर पाटील यांनी स्पष्ट केले होते. यावर्षी त्याचा प्रत्यय आला. वैशाली सूर्यवंशी यांच्या कार्यक्रमाला किशोर पाटील यांनी हजेरी लावली. त्यांच्या समवेत आमदार पाटील यांनी आपले पुत्र सुमित पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होती. त्यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते राखी बांधून घेतली व त्यांना रक्षाबंधनाची भेट दिली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com