Maratha Reservation News : अखेर वाल्मीक बोरगुडे यांनी उपोषण सोडले!

Valmik Borgude withdraw his hunger strike today-मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वाल्मिक बोरगुडे यांनी आज आपले आमरण उपोषण मागे घेतले.
Valmik Borgude hunger strike
Valmik Borgude hunger strikeSarkarnama
Published on
Updated on

Niphad news : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाची आज सांगता झाली. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील वाल्मीक बोरगुडे यांनी सरणावर बसून सुरू केलेल्या उपोषणाची देखील आज पाचव्या दिवशी प्रणव दादा पवार व राजेंद्र डोखळे यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन सांगता केली. (Borgude take a lime water in presence of Pranav Pawar & Rajendra Dokhale)

नैताळे (Niphad) येथील बोरगुडे यांच्या उपोषणाची आज सागंता झाली. मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी उपोषण केले होते.

Valmik Borgude hunger strike
Indapur Politics : हर्षवर्धन पाटलांचा भरणेंवर निशाणा; ‘वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलिबॉल खेळताना पडलो, तर त्यात काय वाईट?’

वाल्मीक बोरगुडे यांनी सरनावर बसून उपोषण सुरू केले होते. त्यामुळे त्यांच्या उपोषणाची चर्चा होती. जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांना पाठींबा देण्यासाठी गर्दी केली होती.

आज पाचव्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील सुमारे पंधरा ते वीस हजार समर्थकांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन समर्थन दिले होते. जिल्ह्यातील असंख्य ग्रामपंचायत तसेच सामाजिक संस्थांनी देखील त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले होते. धारणगाव खडक गाजरवाडी येथील गोंधळींनी कार्यक्रम करून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला होता.

Valmik Borgude hunger strike
Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

आज उपोषणाची सांगता झाली तेव्हा संजय बोरगुडे, राजेंद्र बोरगुडे, दादा बोरगुडे, रतन बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, विजय बोरगुडे, नवनाथ जाधव यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

...

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ नैताळे गावातील नागरिकांनी सर्वप्रथम सहभाग घेऊन त्यांना सक्रीय पाठींबा दिला. समाजाच्या दृष्टीने ही गौरवस्पद कामगिरी आहे. उपोषणकर्ते वाल्मिक बोरगुडे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

-प्रणव दादा पवार, सामाजिक कार्यकर्ते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com