Sujat Ambedkar Politics: सुजात आंबेडकर संतापले, "संविधान वाचविण्यासाठी फक्त वंचितच लढते, अन्य कोणीही नाही"

Vanchit Bahujan Aghaadi; our fight is to save Nations constitution-वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी सुजाता आंबेडकर यांची देवळाली विधानसभा मतदारसंघात सभा झाली.
Sujat Ambedkar
Sujat AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2024: वंचित बहुजन आघाडी आता विधानसभा निवडणुकीत ताकतीने उतरली आहे. त्यांनी आज देवळाली मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली. आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची आज दाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांवर टीका केली.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ अविनाश शिंदे यांच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेत आंबेडकर यांनी विरोधकांना चांगलेच खडसावले. आमची लढाई कोणावरही अवलंबून नाही. आम्ही स्वबळावर राजकीय लढाई लढत आहोत. त्यात यशस्वी होऊन दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंबेडकर म्हणाले, आंबेडकरी विचार संपवण्यासाठी एक ताकद काम करीत आहे. या शक्तीला आंबेडकरी विचार मानवत नाही. त्यामुळे विविध स्तरावर ते आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असतात.

लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला मतदान केले. त्यात प्रामुख्याने संविधान वाचविण्याचा विषय होता. मात्र जेव्हा संसदेत या विषयावर चर्चा होते तेव्हा ते बोलताना दिसत नाहीत. आपली भूमिका मांडायची वेळ येते, तेव्हा हे लोक पळून जातात, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Sujat Ambedkar
Chhagan Bhujbal: भुजबळ म्हणाले, "आगामी पाच वर्षात प्रत्येकाला घर देणार"

त्यामुळे जनतेने आता सावध होऊन विचार केला पाहिजे. संविधानाच्या लढाईत फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष लढणार आहे. आम्हाला सर्व जग बदनाम करण्यासाठी टपून बसले आहेत. आम्ही मात्र त्या सगळ्यांचा मुकाबला करू.

काही विरोधक आम्हाला बी टीम म्हणतात. मात्र आम्ही बी टीम नाही तर भीम टीम आहोत, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. भारतीय जनता पक्षाशी आमचा संघर्ष आहे. त्यांना सर्वच स्तरावर आव्हान दिले जाईल.

ते पुढे म्हणाले, राज्यात कोरेगाव आणि कोपर्डी सारख्या घटना घडल्या. या घटना घडल्या तेव्हा राज्य सरकारने दडपशाहीचा प्रचंड वापर केला. त्या ठिकाणी फक्त वंचित आघाडी राज्यातील सरकार विरोधात उभी राहिली होती. कोपर्डीच्या ठिकाणी कोणीही प्रस्थापित नेते आणि पक्ष आले नव्हते, असा आरोप त्यांनी केला.

Sujat Ambedkar
Saroj Ahire: देवळालीत उमेदवारीचा पेच, आमदार सरोज अहिरे की अहिरराव? उद्या होणार फैसला!

वंचित बहुजन आघाडी आगामी काळात एक वेगळी वैचारिक भूमिका घेऊन मैदानात उतरली आहे. आता आपण दुसऱ्यांच्या खानावळीत जायचे नाही, हे आम्ही ठरवले आहे. कोणाकडेही आम्ही भीक मागायला जाणार नाही.

वंचित आघाडी आता स्वतंत्रपणे उभी राहिल. यंदाची विधानसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण ती संविधान वाचविण्याची लढाई देखील आहे. संविधान असेल तर आरक्षण राहील. आरक्षण नसेल तर ते आपल्याला परवडणारे नाही. आपली पुढची पिढी टिकवायची असेल तर आता ताकतीने उभा रहावे लागणार.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईच्या वेळी बाळासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले होते. कोणाचेही आरक्षण न घेता लढा, अशी भूमिका आपण घेतली होती. आरक्षण नष्ट करायचे नसेल तर आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे बटन दाबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आम्ही राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत केलेली नाही. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये हा गोंधळ सुरू आहे. आम्ही मात्र फक्त जिंकण्यासाठी लढत आहोत. तुमच्या एका मताने बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट होणार आहेत. हे मतदारांनी ध्यानात घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत ठाम भूमिका बजावली पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com