Controversy in Ahmednagar BJP : देवेंद्र फडणवीसांचं 'नॅरेटिव्ह'वर भाष्य; काही वेळातच भाजपमध्ये ठिणगी अन् हकालपट्टीची मागणी...

Letter to Ahmednagar BJP State President Chandrashekhar Bawankule : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचा नियोजन शून्य कारभार भाजप उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वसंत राठोड यांनी लिहिले आहे.
vasant rathod abhay agarkar
vasant rathod abhay agarkarsarkarnama

Ahmednagar BJP News : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लोकसभेतील अपयशावर खापर 'नॅरेटिव्ह'वर फोडणारे भाषण होऊन काही वेळ होत नाही तोच, भाजपच्या अहमदनगरमध्ये राज्यात पहिली ठिणगी पडली आहे. अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सदस्य वसंत राठोड यांनी नगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या मागणीचे पत्र वसंत राठोड यांनी पाठवले असून, याची अस्वस्थता नगर भाजपमध्ये पसरली आहे. पंतप्रधान यांच्या शपथविधीनंतर राज्यपातळीवर पक्ष संघटनेत बराच बदल केले जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात, विशेष करून नगर दक्षिणेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिर्डीमध्ये महायुती शिवसेनेचा पराभव झाला. भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या पराभवावरून नगर भाजपमध्ये तू-तू मैं-मैं सुरू झाली आहे. भाजप (BJP) निष्ठावानमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील एकाने 'विखे यंत्रणे'वर खापर फोडत आहे. परंतु एक गट विखे यांच्याबाजूने ताकदीने उभा आहे. याच गटाने दुसऱ्या गटाकडे बोट दाखवण्यास सुरूवात केली आहे. वसंत राठोड यांच्या या पत्रावरून भाजपमध्ये गटबाजी अधिकच उफळणार, असे दिसते आहे.

नगर (Ahmednagar) शहरातील नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजनामुळे पक्षाच्या उमेदवाराला शहरात कमी मताधिक्य मिळाले. मताधिक्यात घट झाली. त्यामुळे भाजप पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे वसंत राठोड यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नगर शहर भाजपमध्ये बदल गरजेचा असून, नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची तातडीने पदावरून हकालपट्टी करावी, असेही राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

vasant rathod abhay agarkar
Sharad Pawar Ahmednagar Politics : पवारसाहेबांबरोबर गेलेल्या लंकेंना यश; आपलं काय होणार? अजितदादांच्या आमदारांना धास्तीनं ग्रासलं!

आगरकरांवर गंभीर आरोप

वसंत राठोड यांनी पत्रात इतर देखील गंभीर आरोप केले आहेत. नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी लोकसभा मतदानाच्या चार दिवस अगोदर अचानक बूथप्रमुखांची यादी दोन वेळा बदलली. नगर शहर, केडगाव, सावेडी आणि भिंगार मंडलातील बूथ प्रमुख अचानक का बदलले? भाजपचा सबंध नसलेले इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपचे बूथ प्रमुख केले.

या मागचे नेमके कारण काय ? नवीन बूथ प्रमुख निवडणुकीच्या दिवशीसुद्धा बूथवर उपस्थित नसल्याने मतदानावर याचा मोठा परिणाम झाला. पक्षाचे भिंगार मंडलाध्यक्ष असताना सर्व सूत्र शहराचा एक पदाधिकारी पाहात होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पक्षाने दिलेले 'घर चलो' अभियाना व इतर कार्यक्रम फक्त वरिष्ठांना फोटो पाठवण्या पुरतेच राबवले गेल्याचा गंभीर आरोप वसंत राठोड यांनी केला आहे.

निष्ठावानांना डावलले

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचे एकूण सगळेच वागणे निवडणुकीच्या काळात संशयास्पद होते. कार्यक्रमाचे कुठलेही नियोजन नाही, कार्यकर्त्याबरोबर समन्वय नाही, तसेच उत्साह दिसत नव्हता. निवडणुकीच्या काळातच गटातटाचे राजकारण करत पदाधिकाऱ्यांना डावलले.

मी स्वतः अहमदनगर कँटोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष असून सुध्दा त्यांनी नेहमी मला दुय्यम वागणूक देत सक्रिय प्रचारातून टाळले. आगरकर अध्यक्ष झाल्यापासून गटबाजी करण्यात व्यग्र होते. माझ्यासह अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम व अविश्वास निर्माण झाला. यातून पक्षाच्या पदरी अपयश आले, असेही देखील वसंत राठोड यांनी म्हटले आहे.

व्यक्ती द्वेषाने पछाडलेले

विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षातील वरिष्ठांनी पक्षाची पुन्हा बांधणी करणे गरजेचे आहे. नेतृत्वहीन, गोंधळलेल्या मानसिकतेच्या, व्दिधा मनस्थितीत अडकलेल्या आणि व्यक्ती द्वेषाने पछाडलेल्या अभय आगरकर यांची तातडीने पदावरून हकालपट्टी करावी. विधानसभेला नगर शहरातून भाजपचा उमेदवार देऊन आमदार करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिशा द्यावी, असेही वसंत राठोड यांनी पत्रात म्हटले.

vasant rathod abhay agarkar
Pankaja Munde : विखेंवरचा विश्वास उडाला, पंकजा मुंडेंसाठी नगर भाजपनं श्रेष्ठींना पत्र धाडलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com