Vijaykumar Gavit Politics : ...म्हणून विजयकुमार गावितांनी पुन्हा एकदा कसली कंबर अन् सुरू केली मोर्चेबांधणी!

Vijaykumar Gavit active in Nandurbar : शहरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. जाणून घ्या, काय आहे कारण?
Vijaykumar Gavit
Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Politics and Vijaykumar Gavit : डॉ. विजयकुमार गावित गेली अनेक वर्ष सत्तेत होते. या कालावधीत प्रदीर्घकाळ त्यांनी आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद सांभाळले. त्या माध्यमातून त्यांचा मोठा संपर्क होता. नंदुरबार म्हणजे भाजपनेते डॉ विजयकुमार गावित असे एक राजकीय समीकरण बनले आहे. या समीकरणाला गेल्या काही दिवसात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत कन्या डॉक्टर हिना गावित यांचा पराभव आणि त्या पाठोपाठ डॉक्टर विजय गावित यांची मंत्रिमंडळातून गच्छंती ही महत्वाची कारणे दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे नंदुरबार शहराच्या राजकारणात डॉ गावित यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न सातत्याने केला. सध्या नगरपालिकेत देखील माजी आमदार रघुवंशी यांचाच वरचष्मा आहे. त्यामुळे मंत्रिपद गेल्याबरोबर डॉ गावित यांच्याकडे होणारी गर्दी ही कमी झाल्याचे दिसत आहे. सध्या विजयकुमार गावित(Vijaykumar Gavit) यांना शहरातील कार्यक्रमांना देखील फारसे निमंत्रित केले जात नाहीत. त्यामुळे डॉ गावित राजकीय दृष्ट्या एकटे पडतात की, काय अशी स्थिती सध्या आहे. शिवसेना नेते रघुवंशी यांनी त्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Vijaykumar Gavit
Bangladeshi issue Malegaon : मालेगावची स्थिती, 'इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...'

नंदुरबार नगरपालिकेच्या(Nandurbar) निवडणुका काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने माजी आमदार रघुवंशी यांना आव्हान देण्यासाठी माजी मंत्री विजयकुमार गावित आता कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यांनी शहरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या दौऱ्यात ते पिण्याचे पाणी, स्वच्छता, नागरी समस्या अशा छोट्या छोट्या विषयांमध्ये लक्ष घालू लागले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

एकेकाळी स्वतः आमदार, राज्याचे मंत्री, कन्या खासदार, दुसरी कन्या जिल्हा परिषदेची अध्यक्ष, पत्नी जिल्हा परिषद सदस्य, अन्य संबंधित दोन जण जिल्हा परिषदेचे सदस्य अशी सर्व सत्ता आपल्या घरी ठेवणारे डॉ गावित सत्ता जाताच अस्वस्थ झाले की काय?, अशी टीका त्यांचे विरोधक करू लागले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत आपले कट्टर विरोधक माजी आमदार रघुवंशी यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी हा राजकीय डाव खेळला आहे. तो कितपत यशस्वी होतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Vijaykumar Gavit
Chandrashekhar Bawankule : धसांचा एकदा नव्हे, दोनदा करेक्ट कार्यक्रम! बावनकुळे यांच्या मनात चाललयं तरी काय?

आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री असताना डॉ गावित यांनी आपल्या विरोधकांना सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या माध्यमातून खेळलेले हे डाव यशस्वी देखील होत होते. सध्या मात्र गावित यांचे हेच विरोधक महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे महायुतीचे घटक म्हणून नंदुरबार शहराच्या राजकारणावर वर्चस्व कोणाचे? यासाठी विजयकुमार गावित यांची ही राजकीय खेळी सुरू झाली आहे. त्यांच्या विरोधकांची रोज वाढणारी संख्या विचारात घेता गावित यांचा हा मार्ग सोपा नाही, हे मात्र नक्की.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com