Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरेंच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांना अटक, स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला फटकावले!

Uddhav Thackeray's Former District Heads Arrested – SBI Employee Assaulted: मराठीच्या प्रश्नावरून शिक्षिकेशी वाद घालणाऱ्या धुळ्याच्या स्टेट बँकेत उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ.
Shivsena Office bearers at Dhule
Shivsena Office bearers at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: देवपूर (धुळे) येथील स्टेट बँकेच्या शाखेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्याने मराठीच्या प्रश्नावरून शिक्षिकेचा अवमान केला. त्यामुळे हे प्रकरण तापले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवपूर (धुळे) शाखेत शिक्षिका पद्मा किसन शिंदे या सोनेतारण कर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. व्यवस्थापक अतुल राजेंद्र कुमार गांधी यांनी त्यांना अवमानकारक वागणूक दिली. मराठी बोलणार नाही, असे धमकावले. त्यावरून बँकेत चांगलाच वाद झाला

शिक्षिका शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि पदाधिकाऱ्यांनी बँकेत धाव घेतली. यावेळी त्यांनी कर्मचारी सदाशिव आजगे यास ‘तू मराठी असूनही गुजराती माणसाची बाजू का घेतो’ असा जाब विचारत कानशिलात लगावली.

Shivsena Office bearers at Dhule
Sudhakar Badgujar Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुधाकर बडगुजर यांचा होणार भाजप प्रवेश!

त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मराठीतूनच ग्राहकांशी बोलले पाहिजे. ग्राहकांना नम्र आणि वेळेत सेवा दिली पाहिजे, असे सांगत महिलेशी मराठीच्या विषयावरून वाद घालणाऱ्या कर्मचाऱ्याला संबंधित शिक्षिकेच्या पाया पडायला लावले. शिक्षिकेची माफी मागण्यास भाग पाडले.

Shivsena Office bearers at Dhule
Shivsena MNS Alliance Proposal : ठाकरे बंधूंच्या युतीसाठी अद्वय हिरेंचा 'मातोश्री'वर थेट प्रस्ताव...

हा प्रकार घडत असताना बँकेत मोठी गर्दी जमली होती. शिवसेनेच्या अन्य कार्यकर्त्यांनी ही मराठीच्या प्रश्नावरून बँकेच्या मराठी अधिकाऱ्याला छापले. त्यानंतर बँक कर्मचारी आजगे याने धुळे पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारी दाखल करण्यावरून पोलिस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांत चांगलाच वाद रंगला.

यावेळी शिक्षिका श्रीमती शिंदे यांनीही पोलीस ठाण्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आहे. मराठी भाषेत बोलण्याऐवजी अवमान करण्यात आला. अतिशय उद्धट व गैर जबाबदार पद्धतीने वर्तन करण्यात आले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी श्रीमती शिंदे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. याबाबत पोलिसांनी परस्परांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांसह शिक्षिका आणि अन्य पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना अटक केल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पोलिसांनी स्टेट बँकेच्या शाखा अधिकारी गांधी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी अपमान केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत घातली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com