municipal election : शिंदेंच्या 'रोड शो'ने बालेकिल्ल्यातील लोकच त्रस्त? रुग्णवाहिका, दुचाकीस्वार अन्...; राऊतांनीही टायमिंग साधलं...

Eknath Shinde Rally : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार वेग आला असून महायुतीकडून संपूर्ण राज्य पिंजून काढलं जातंय. राज्याचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
Thane municipal election; Eknath Shinde
Thane municipal election; Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रोड शो केला.

  • रोड शोमुळे ठाणे स्टेशन ते मानपाडा परिसरात भीषण वाहतूक कोंडी झाली.

  • अवघ्या 10 मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना 30 ते 45 मिनिटे ताटकळत राहावे लागले.

Thane Thane Municipal Election News : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्षांनी आपली मोर्चे बांधणी केली आहे. कुठे एकत्र तर कुठे एकला चलोचा नारा देत महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग दिला आह. पण आता या प्रचाराचा फटका सर्व सामान्यांना बसताना दिसत आहे. नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीनिमित्ताने शहरात रोड शो काढला. ज्यामुळे येथे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. या कोंडीमुळे कामाहून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रॅली काढली. त्यांनी सिडको, टेंभीनाका, कोर्टनाका, नितीन कंपनी मार्गावर रोड शो करत प्रचाराचा नारळ फोडला. या रोड शोला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले. पण यामुळे ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

ठाणे स्थानकापासून ते अगदी मानपाड्यापर्यंत सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. यामुळे कामावरून परतणाऱ्या चाकरमांन्याना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास ठाणेकरांना ताटकळत राहावे लागल्याने हाल झालेत.

Thane municipal election; Eknath Shinde
Uddhav Thackeray VS Eknath Shinde : खरी शिवसेना कोणाची? मुंबई महापालिकेच्या आखाड्यात होणार फैसाल; 64 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे थेट लढत

ठाणेकरांना झालेल्या मनस्ताप आणि त्यानंतर उठलेल्या संतापाच्या लाटेनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाण्याला ‘नमो ठाणे’ म्हटले जातय. जी लाजिरवाणी बाब आहे. पण आता त्याचे उत्तर ठाणेकर मतपेटीतूनच देतील. ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे नाही, तर धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

तसेच यावेळी राऊत यांनी, ठाणे शहर अमली पदार्थांच्या विक्रीचा मोठा अड्डा बनत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर हा अड्डा चालवणारा आणि कंत्राटदारांचा बॉस असलेला रहेमान डकेत कोण? असा सवाल करताना, शहरात गंभीर परिस्थिती असतानाही पोलिस प्रशासन कुठे आहे? असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी, आमच्या उमेदवारांवर कारवाई होते; मात्र गुन्हेगारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावाही केला आहे.

वाहनांच्या रांगा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली सिडको येथील चेंदणी कोळीवाडा, राघोबा शंकर रोड येथून सुरू झाली. ज्यानंतर ती टेंभीनाका, चंदनवाडी, सिद्धेश्वर तलाव, ज्ञानेश्वर नगर-शंकर मंदिर चौक, लोकमान्यनगर डेपो, भीमनगर, वर्तकनगर आणि मानपाडा- मनोरमानगर या मार्गावरून गेला. यावेळी रोड शोला शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यामुळे अवघ्या 10 ते 15 मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्ध्या तासापर्यंत वाहतुकीत अडकून राहावे लागले. कोंडी टाळण्यासाठी अनेकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला; मात्र तेथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. यामुळे रुग्णवाहिका, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष अडचण झाली. ज्यामुले आता संताप व्यक्त केला जातोय.

Thane municipal election; Eknath Shinde
Eknath Shinde Thane residence : शिंदेंच्या निवासस्थानी मनसे उमेदवार, कशासाठी? ठाकरेंच्या शिलेदारांनी व्हिडिओच आणला समोर...

FAQs :

Q1. ठाण्यात वाहतूक कोंडी कशामुळे झाली?
➡️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

Q2. हा रोड शो कशासाठी आयोजित करण्यात आला होता?
➡️ ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रोड शो आयोजित करण्यात आला होता.

Q3. कोणकोणते भाग सर्वाधिक प्रभावित झाले?
➡️ ठाणे स्टेशनपासून मानपाड्यापर्यंतच्या अंतर्गत रस्त्यांवर मोठी कोंडी झाली.

Q4. नागरिकांना किती वेळ अडकावे लागले?
➡️ काही नागरिकांना 30 ते 45 मिनिटांपर्यंत वाहतुकीत अडकावे लागले.

Q5. नागरिकांची प्रतिक्रिया काय होती?
➡️ कामावरून परतणाऱ्या ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com