Ramdas Athawale News : आठवलेंनी पुन्हा दिली भुजबळांना ऑफर ; म्हणाले, 'भाजपपेक्षा...'

Visit to Sai Temple in Shirdi : संधी मिळाल्यास शिर्डी लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार.
Chhagan Bhujbal, Ramdas Athawale
Chhagan Bhujbal, Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : मंत्री छगन भुजबळ ओबीसी प्रश्नासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. ओबीसींच्या प्रश्नांवरूनच त्यांनी शिवसेना सोडली होती. आता त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी मंत्रिमंडळात राहिले पाहिजे. मात्र भाजपपेक्षा ते आरपीआयमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करू, अशी ऑफर आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळांना दिली आहे. (Ramdas Athawale offer to Chhagan Bhujbal)

रविवारी सकाळी आठवले साई दरबारी पोहोचले आणि साई चरणी नतमस्तक झाले. यावेळी साई संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, लोकसभेसाठी मी साईबाबांच्या दर्शनाला आलो नाही. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. सर्वधर्म समभावाची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. मला हिंदू धर्माचे लोक जिथे बोलावतात मी तिथे जातो. सर्व धर्मियांनी गुण्यागोविंदाने राहावे, ही बाबासाहेबांची इच्छा होती, असे त्यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal, Ramdas Athawale
Shirdi Lok Sabha : रामदास आठवलेंनी सांगितली शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्यातील तांत्रिक अडचण

यावेळी त्यांच्यासोबत शिर्डी लोकसभेतील आरपीआयचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. संधी मिळाल्यास शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला. 2009 साली शिर्डीत काही गैरसमजातून माझा पराभव झाला. मात्र आता मी केंद्रात मंत्री आहे. पुन्हा शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी अनेक लोक आग्रही आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे - पवारांचा पक्ष फुटला नसता...

अलीकडे अत्यंत गलिच्छ राजकारण बघायला मिळत आहे. पक्षाचे नेते आमदार सांभाळू शकले नाही, म्हणून ते फुटले. उध्दव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला असता तर 40 आमदार फुटले नसते. देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी मोदींच्या सोबत यायला हवे होते. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय 2014 ला राष्ट्रवादीने घेतला होता.

आता शरद पवारांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. त्यांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांचाही पक्ष फुटला नसता. आम्ही त्यांना फोडले नाही तर त्यांचे आमदार आमच्याकडे आले. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पक्ष फोडल्याचा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

(Edited by Amol Sutar)

Chhagan Bhujbal, Ramdas Athawale
Vijay Wadettiwar News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका ; म्हणाले, 'मर्जीतील अधिकाऱ्यांचे...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com